-
क्रिकेटपटू आणि त्यांचे अलिशान बंगले/घरं हा सर्वांसाठीच एक चर्चेचा विषय असतो. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नुकतच आपली गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत राहण्यासाठी मुंबईत एक अलिशान घर घेतल्याची माहिती आहे.
-
इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानूसार कोहलीच्या या अलिशान घराची किंमत सुमारे ३४ कोटींच्या घरात आहे.
-
७ हजार १७१ स्क्वे.फूट इतकं प्रशस्त घर घेतल्यानंतर विराटने आपल्या छोट्या छोट्या गोष्टींची इथे खास काळजी घेतलेली आहे.
-
कोहलीचं हे नवीन घर ३५ व्या मजल्यावरुन असून, खास अनुष्कासाठी विराटने खास समुद्र समोर दिसेल अशी जागा घेतलेली आहे.
-
कोहली आणि अनुष्काच्या खास सुचना लक्षात घेऊन या अलिशान घराचं बांधकाम करण्यात आलंय.
-
वरळीतल विराट कोहलीचं हे नवीन घर सध्या सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरतंय. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोहलीने या अलिशान घराचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
विराट कोहलीच्या अलिशान घराचे फोटो पाहिलेत का?
गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासाठी विराटचं मुंबईत अलिशान घर
Web Title: Virat kohli buys special house in mumbai for her girlefriend anushka sharma cost around 34 crore watch special photos here