-
एकीकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघ आफ्रिकेत निराशाजनक कामगिरी करत असताना आता भारतीय महिलांनी कोट्यवधी चाहत्यांना चांगली बातमी देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांचा संघ आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी सचिन तेंडुलकरने महिला खेळाडूंना खास टिप्स दिल्या.
-
यावेळी सचिन तेंडुलकरने भारतीय महिलांना सकारात्मक दृष्टीकोन मनात ठेऊन, खेळपट्टी आणि वातावरणाविषयी भीती न बाळगण्याचा सल्ला दिला.
-
यादरम्यान महिला खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी एका छोटेखानी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये सचिनने मिताली राजच्या सहकाऱ्यांना क्षुल्लक चुका टाळण्याचा सल्ला दिला.
-
या भेटीदरम्यान सचिनने सर्व खेळाडूंचे आभार मानत त्यांच्यासोबत एक सेल्फीही काढला.
-
मात्र एका सेल्फीत कोणाचं मन भरतंय? मग सचिनने महिला खेळाडूंच्या विनंतीला मान देत खास सेल्फीसेशनही केलं.
भारतीय महिला क्रिकेट संघ आफ्रिका दौऱ्यावर, मिताली राजच्या संघाला सचिनचा कानमंत्र
वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका रंगणार
Web Title: Master blaster sachin tendulkar gave tips to indian womens cricket team watch exclusive photos