• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rip mamba kobe bryants career photo bmh

जगाला मोहिनी घालणारा बास्केटबॉलचा जादूगार!

कोबीने बास्केटबॉलला लिहिलेल्या प्रेमावर सिनेमा आला होता

January 27, 2020 14:24 IST
Follow Us
  • सोमवारची सकाळ जागतिक क्रीडा क्षेत्रासाठी वाईट ठरली. अमेरिकेतील लॉस एंजलिस भागात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सुप्रसिद्ध माजी बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा मृत्यू झाला. कोबे त्याची १३ वर्षांची मुलगी आणि इतर ९ प्रवाशांवर काळानं घाला घातला. कोबेच्या अपघाती निधनामुळे क्रीडा जगतावर शोककळा पसरली. (Source: AP)
    1/12

    सोमवारची सकाळ जागतिक क्रीडा क्षेत्रासाठी वाईट ठरली. अमेरिकेतील लॉस एंजलिस भागात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सुप्रसिद्ध माजी बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा मृत्यू झाला. कोबे त्याची १३ वर्षांची मुलगी आणि इतर ९ प्रवाशांवर काळानं घाला घातला. कोबेच्या अपघाती निधनामुळे क्रीडा जगतावर शोककळा पसरली. (Source: AP)

  • 2/12

    लॉस एंजलिस येथून उड्डाण केल्यानंतर कॅलिफॉर्निया भागात ढगाळ वातावरणात हेलिकॉप्टरच्या पायलटचं नियंत्रण सुटलं. यानंतरच हा अपघात घडला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंटच्या मालकीचं होतं. (Source: AP)

  • 3/12

    कोबी ब्रायंटची मुलगी गियेना देखील एक बास्केटबॉलपटू होती. गियेना बास्केटबॉल अकादमीच्या सामन्यात सहभागी होणार होती. याच सामन्यासाठी जात असताना कोबे आणि तिच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. (Source: AP)

  • 4/12

    बास्केटबॉलपटूमधील पाच महान खेळाडूंची नाव घ्यायची ठरवल्यास त्यातून कोबी ब्रायंटचे नाव कुणालाही वगळता येणार नाही. (Source: AP)

  • 5/12

    नतालिया, बियांका आणि कॅप्री या तीन मुलींसोबत ब्रायंट. (Source: AP)

  • 6/12

    ४१ वर्षीय कोबे ब्रायटंने २०१६ साली निवृत्ती स्विकारली. कोबी ब्रायंट हा तब्बल २० वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये (NBA) सक्रिय होता. (Source: AP)

  • 7/12

    २०१६च्या एप्रिलमध्ये निवृत्त झालेल्या कोबीने २००८ मध्ये एनबीएचा सर्वात महान खेळाडूचा किताब मिळवला होता. (Source: AP)

  • 8/12

    कोबीने दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकले. त्याचबरोबर २००६ मध्ये टोरांटो रॅपटर्सविरुद्धच्या सामन्यात कोबीने एका सामन्यात तब्बल ८१ गुण मिळवले होते. ही त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम खेळी होती. (Source: AP)

  • 9/12

    आपल्या काळात ब्लॅक मांबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोबेने पाचवेळा संघाला NBA Championship मिळवून दिली होती. (Source: Reuters)

  • 10/12

    आपल्या कारकिर्दीत कोबेने १८ वेळा NBA All Star हा मानाचा किताब पटकावला होता. याचबरोबर अन्य पुरस्कारांनीही त्याचा सन्मान करण्यात आलेला होता. (Source: AP)

  • 11/12

    बास्केटबॉलमधील अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवणाऱ्या कोबीने ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला आहे. कोबीने २०१५मध्ये बास्केटबॉलला एक प्रेम पत्र लिहले होते. या प्रेम पत्रावरून 'डिअर बास्केट बॉल' शॉर्ट अॅनिमेटेड चित्रपट तयार करण्यात आला होता. (Source: AP)

  • 12/12

    फक्त अमेरिका किंवा बॉस्केटबॉल लोकप्रिय असणाऱ्या देशांतील नव्हे तर भारतातील अनेक क्रीडा आणि सिने क्षेत्रातील व्यक्तींनी श्रद्धांजली वाहिली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. (Source: AP)

Web Title: Rip mamba kobe bryants career photo bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.