• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. pakistan former cricketer shoaib akhtar indian former cricketer virendra sehwag sgy

बाप बाप होता है! सेहवागकडे आहे त्याच्या अर्धी संपत्ती शोएब अख्तरकडे, मैदानाबाहेरही विरुच अव्वल

शोएब अख्तरने आपल्याकडे सेहवागच्या डोक्यावर केस नाहीत तेवढी संपत्ती आहे असं म्हटलं आहे

January 28, 2020 17:50 IST
Follow Us
    • पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने नुकतंच भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागवर टीका करत वादाला तोंड फोडलं.
    • शोएब अख्तर पैसा कमावण्यासाठी भारताचं कौतुक करत असतो असं सेहवागने २०१६ मध्ये एका चॅट शोमध्ये म्हटलं होतं.
    • त्या तीन वर्ष जुन्या व्हिडीओवर शोएब अख्तरने प्रतिक्रिया देताना सेहवागच्या डोक्यावर जेवढे केस नाहीत तेवढे माझ्याकडे पैसे आहेत असं उत्तर दिलं होतं.
    • सेहवागच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शोएबने म्हटलं होतं की, "संपत्ती अल्लाह देतो भारत नाही. जेवढे सेहवागच्या डोक्यावर केस नाहीत, तेवढे माझ्याकडे पैसे आहेत".
    • तसंच आपले सोशल मीडिया फॉलोअर्सदेखील जास्त असल्याचा दावा त्याने केला होता.
    • यानंतर शोएबने लगेचच ही मस्करी असल्याचं स्पष्ट केलं.
    • "मी मिश्कील पद्धतीने हे बोलत आहे. कृपया हा एक जोक म्हणूनच घ्या," असंही यावेळी शोएबने सांगितलं होतं.
    • शोएब अख्तरने संपत्तीच्या बाबतीत मोठा दावा केला असला तरी सत्य मात्र वेगळं आहे.
    • खरं तर संपत्तीच्या बाबतीत शोएब अख्तर विरेंद्र सेहवागच्या जवळपासही फिरकत नाही. (एक्स्प्रेस फोटो – कमलेश्वर सिंग)
    • विरेंद्र सेहवागकडे शोएब अख्तरच्या दुप्पट संपत्ती आहे.
    • फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, विरेंद्र सेहवागकडे एकूण ३०० कोटींची संपत्ती आहे.
    • विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला असला तरी जाहिराती, समालोचन, क्रिकेट प्रशिक्षण, शाळा आणि सोशल मीडियावरील पेड प्रमोशनच्या माध्यमातून कोटींची कमाई करतो. (PTI Photo)
    • सेहवागने २०१९ मध्ये ४१ कोटींची कमाई केली. (PTI Photo)
    • सेहवागने हरियाणामधील अनेक ठिकाणी शाळा सुरु केली आहे. सेहवाग इंटरनॅशनल स्कूल असं या शाळेचं नाव आहे. (एक्स्प्रेस फोटो – कमलेश्वर सिंग)
    • दुसरीकडे शोएब अख्तरची संपत्ती सेहवागच्या तुलनेत अर्धी आहे. शोएब अख्तरची एकूण संपत्ती १६३ कोटी इतकी आहे.
    • सोशल मीडियावरील फॉलोअर्सबद्दल बोलायचं गेल्यास तिथेही सेहवागच अव्वल आहे.
    • शोएब अख्तरचे १९ लाख युट्यब फॉलोअर्स असून सेहवागचं कोणतंही युट्यूब चॅनेल नाही.
    • मात्र हे दोघंही ट्विटरवर सक्रीय आहेत.
    • ट्विटरवर शोएब अख्तरचे २७ लाख फॉलोअर्स आहेत.
    • तर सेहवागचे २ कोटी फॉलोअर्स आहेत. (Express photo by Oinam Anand)
    • 1/25

      विरेंद्र सेहवागने भारतीय संघाकडून १०४ कसोटी, २५१ एकदिवसीय आणि १९ टी-२० सामने खेळले आहेत.

    • 2/25

      कसोटीमध्ये सेहवागने ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या. ३१९ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने एकूण २३ शतकं तर ३२ अर्धशतकं झळकावली आहेत.

    • 3/25

      कसोटीमध्ये द्विशतक आणि त्रिशतक झळकावणारा विरेंद्र सेहवाग एकमेव खेळाडू आहे.

    • 4/25

      एकदिवसीय कारकिर्दीत त्याच्या नावे ८२७३ धावा आहेत. त्यात १५ शतकं आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.

    • 5/25

      तर १९ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ३९४ धावा केल्या.

Web Title: Pakistan former cricketer shoaib akhtar indian former cricketer virendra sehwag sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.