• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mayanti langer the bold sports cricket anchor dmp

PHOTOS: बोल्ड, बिनधास्त स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरबद्दल जाणून घ्या खास गोष्टी

February 10, 2020 20:23 IST
Follow Us
  • मयंती लँगर हे नाव माहित नाही, असे क्रिकेटप्रेमी भारतात अभावानेच सापडतील. क्रिकेट सामन्याप्रमाणे मयंतीचे अँकरींगही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. ( सर्व फोटो - मयंती लँगर इन्स्टाग्राम)
    1/15

    मयंती लँगर हे नाव माहित नाही, असे क्रिकेटप्रेमी भारतात अभावानेच सापडतील. क्रिकेट सामन्याप्रमाणे मयंतीचे अँकरींगही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. ( सर्व फोटो – मयंती लँगर इन्स्टाग्राम)

  • 2/15

    जगभरातील महत्वाच्या क्रिकेट स्पर्धांचे अँकरींग मयंती करते. फुटबॉल, कॉमनवेल्थ गेम्सचे अँकरींगही मयंतीने केले आहे.

  • 3/15

    आठ फेब्रुवारी १९८५ रोजी दिल्लीमध्ये मयंतीचा जन्म झाला. मयंतीचे बालपण अमेरिकेत गेले.

  • 4/15

    मयंतीचे आजोबा भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल होते. त्यामुळे अमेरिकेत आजी-आजोबाच्या देखरेखीखाली मयंतीचे बालपण कडक शिस्तीचे होते. मयंतीची आई प्रसिद्ध शिक्षिका होती.

  • 5/15

    मयंतीचे वडिल संजीव लँगर यांनी युनायटेड नेशन्समध्ये काम केले आहे. दिल्लीच्या हिंदू कॉलेज विद्यापीठामधून मयंतीने बीए हॉर्न्समध्ये पदवी मिळवली.

  • 6/15

    लहानपणापासून मयंतीला फुटबॉलची आवड होती आणि शालेय स्तरावर ती फुटबॉल स्पर्धांमध्ये खेळायची. दिल्लीच्या सुपर सॉकर प्रबोधिनीमध्ये तिने फुटबॉलचे प्रशिक्षण घेतले आहे.

  • 7/15

    मयंतीने ग्राफीक डिझायनरचे प्रशिक्षण घेतले होते. 'फिफा बीच फुटबॉल' स्पर्धेत प्रयोग म्हणून तिने स्पोटर्स अँकरींग केले. त्यानंतर तिने अँकर बनण्याचा निर्णय घेतला.

  • 8/15

    मयंतीने २०११, २०१५ क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत अँकरींग केले. २०१४ इंडियन सुपर लीग, २०१० फिफा वर्ल्डकप, २०१० कॉ़मन वेल्थ गेम्स आणि २०१८ आयपीएलच्या मोसमाचे अँकरींग तिने केले आहे.

  • 9/15

    अमेरिकेत असताना मयंतीला फुटबॉलमध्ये रुची निर्माण झाली. आज मयंती भारतातील एक नावाजलेली महिला स्पोटर्स अँकर आहे.

  • 10/15

    सप्टेंबर २०१२ मध्ये मयंती लँगर क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीबरोबर विवाहबद्ध झाली. स्टुअर्ट बिन्नीनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

  • 11/15

    स्टुअर्ट बिन्नी भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नीचा मुलगा आहे. स्टुअर्ट अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो.

  • 12/15

    क्रिकेटबरोबर मयंती लँगरने अनेक फुटबॉल स्पर्धांचेही अँकरींग केले आहे. हे फार कमी जणांना माहित असेल, मयंती तिच्या कॉलेज फुटबॉल टीमचीही सदस्य होती. कॉलेजच्या टीममध्ये तिने स्ट्रायकरची भूमिका बजावली आहे.

  • 13/15

    ड्रेसिंग स्टाइल खासकरुन शॉर्ट स्कटर्स घालण्यावरुन अनेकदा मयंती लँगरला ट्रोलही करण्यात आले आहे.

  • 14/15

    क्रिकेट सामन्यांच्या अँकरींगच्यावेळी कपडयांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मयंती सडेतोड उत्तरेही देत असते.

  • 15/15

    एका कार्यक्रमामध्ये मयंती पती स्टुअर्ट बिन्नीसोबत सेल्फी घेताना.

Web Title: Mayanti langer the bold sports cricket anchor dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.