• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. new motera stadium president donald trump may inaugurate world largest cricket stadium nck

मोदींचं स्वप्न पूर्ण; गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम, ट्रम्प यांच्या हस्ते होणार उद्घाटन

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड पेक्षा हे मोठे स्टेडियम आहे.

February 13, 2020 15:11 IST
Follow Us
    • आपल्या देशात आता सर्वात मोठं क्रिकेट मैदान जवळपास तयार झालं आहे. गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठं स्टेडियम साकारण्यात येत होतं ज्याचं काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे (सर्व छायाचित्रे – सोशल मीडिया)
    • 1/20

      अहमदाबाद येथील 'सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम'चा कायापालट करण्यात आला आहे. एकाचवेळी १ लाख १० हजार प्रेक्षक बसण्याची या स्टेडियमची क्षमता आहे

    • या स्टेडियमचं उद्घाटन अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे.
    • 2/20

      अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबाद येथे जंगी स्वागत करण्यात येणार असून त्यांचा मोठा रोड शो होणार आहे.

    • 3/20

      ट्रम्प यांच्या मार्गातील झोपडपट्टी झाकण्यासाठी भिंतीची उभारणी करण्यात येत आहे

    • 4/20

      स्टेडियमवर ह्यूस्टनमधील ‘हाउडी मोदी’ मेळाव्याच्या धर्तीवर ‘केम छो ट्रम्प’ मेळावा (हाउडी ट्रम्प) घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास लाखो लोकांची उपस्थिती राहणार आहे.

    • 5/20

      २४ फेब्रुवारीला ट्रम्प हे अहमदाबादला येणार असून मोदी त्यांच्या राज्यात अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचा खास पाहुणचार करणार आहेत

    • 6/20

      अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम या दहा कि.मीच्या रस्त्यावरून ट्रम्प यांचा रोडशो होणार असून यावेळी लाखो भारतीय दुतर्फा त्यांच्या स्वागतास सज्ज असतील.

    • 7/20

      अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्या समवेत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केलाअसून ट्रम्प यांचे संस्मरणीय स्वागत करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे

    • 8/20

      अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम साकारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. त्यानुसार हे स्टेडियम तयार करण्यात आलं आहे.

    • स्टेडियममध्ये एकूण ७६ कॉर्पोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रुम, क्लब हाऊस, ऑलिम्पिकच्या दर्जाचे स्विमिंग पूल आहेत.
    • 9/20

      ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे जगातील सध्याचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मानले जाते.

    • मेलबर्न क्रिकेट स्टेडियमची तब्बल ९० हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. तर कोलकाताचे इडन गार्डन स्टेडियम हे भारतातील सध्याचे सर्वात मोठे स्टेडियम आहे. इडन गार्डन स्टेडियमची आसनक्षमता ६६,००० इतकी आहे.
    • 10/20

      मेलबर्न क्रिकेट स्टेडियमचे डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्ट पॉप्युलर कंपनीलाच अहमदाबादमधील स्टेडियमच्या उभारणीचे काम देण्यात आले

    • 11/20

      हे स्टेडियम बांधण्यासाठी १० कोटी रुपये खर्च आला असून तेथे सव्वा लाख लोक एकाचवेळी बसू शकतात. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड पेक्षा हे मोठे स्टेडियम आहे.

    • 12/20

      एप्रिल महिन्यात या स्टेडियमवर पहिला सामना रंगणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

    • 13/20

      हे स्टेडियम फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित न राहता हॉकी, बास्केटबॉल,कबड्डी, लॉन टेनिस, बॅटमिंटन, स्विमिंग या खेळांनाही येथे प्राधान्य मिळेल.

    • या स्टेडियमचं आणखी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या स्टेडियममध्ये सेंट्रल एसी आणि दिव्यांगासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे.
    • एक लाख दहा हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये तीन हजार कार आणि दहा हजार दुचाकी पार्क होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
    • अहमदाबाद येथील सध्याचं मोटेरा स्टेडियम १९८२ साली बनवण्यात आलं होतं. गुजरात येथील क्रिकेट असोसिएशनसाठी ५० एकर क्षेत्रात पसरलेले साबरमती नदीच्या काठी वसलेले हे स्टेडियम सन्मानाचं प्रतिक आहे.

Web Title: New motera stadium president donald trump may inaugurate world largest cricket stadium nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.