-
दोन महिन्यांच्या अंतरात दोन द्विशतक झळकावण्याची किमया साधणाऱ्या १४ वर्षाच्या समित द्रविडने आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. राहुलने क्रिकेट खेळताना अनेक विक्रम नोंदवले आता द्रविडचा मुलगा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत धडाकेबाज कामगिरी करत आहे. समितने फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीतही आपली चमक दाखवली आहे. (सर्व व्हायरल छायाचित्र सौजन्य – ट्विटर आणि फेसबुक)
-
सोशल मीडियावरुन समितवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी त्याची तुलना राहुल द्रविडसोबत केली आहे.
-
तर, भारताला भविष्यातील द वॉल मिळाली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. भविष्यातील भिंत बांधण्याची, छोट्या The Wall ची प्रक्रिया सुरू आहे, असेही काहींनी म्हटले आहे.
-
अन्वय द्रविडही वडिलांना अभिमान वाटावा असा खेळतोय, पण समित मात्र खूपच आक्रमकपणे खेेळत आहे. असं ट्विट एका युजरने केले आहे.
-
गेल्या दोन महिन्यांच्या काळात समित द्रविडने पाच वनडे सामन्यात तब्बल ६८१ धावा केल्या आहेत. यात दोन द्विशतके, एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
-
विशेष म्हणजे तब्बल २७७च्या सरासरीने धावा करणाऱ्या समितने ७ विकेट देखील घेतल्या आहेत.
समितने पहिले द्विशतक १४४ चेंडूत केले होते. तेव्हा त्याने २११ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या द्विशतकासाठी त्याने १४६ चेंडू घेतले. -
सोमवारी समितने कर्नाटकमधील १४ वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धेत माल्या अदिती या शाळेकडून खेळताना धडाकेबाज द्विशतकी खेळी केली आणि दोन महिन्यांच्या अंतरात दोन द्विशतक झळकावण्याची किमया साधली.
समितने Mallya Aditi International शाळेचं प्रतिनिधीत्व करतो, BTS Shield स्पर्धेत समितने १४६ चेंडूचा सामना करताना ३३ चौकारांसह द्विशतक झळकावलं. गेल्या काही महिन्यांमधलं समितचं हे दुसरं द्विशतक ठरलं आहे. श्री कुमारन संघाविरुद्ध त्याने वनडे क्रिकेटमधील दुसरे द्विशतक झळकावले. -
तो सध्या १४ वर्षाखालील बीटीआर शिल्ड स्पर्धेत माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलकडून खेळत आहे.
-
समितच्या या धडाकेबाज द्विशतकाच्या जोरावर त्याच्या संघाला विजय मिळाला. या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी श्री कुमारन चिल्ड्रन अकादमीच्या संघाला २६७ धावा करता आल्या आणि त्यांचा ११० धावांनी पराभव झाला.
-
२०१९ डिसेंबर महिन्यातही समितने असचं द्विशतक झळकावलं होतं. धारवाड संघाविरोधात खेळताना समितने २११ धावा करत ३ बळी घेतले होते.
-
यानंतर याच सामन्यात दुसऱ्या डावात समितने फटकेबाजी करत नाबाद ९४ धावा केल्या होत्या, मात्र या खेळीनंतरही समितच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
-
राहुल द्रविडचा लहान मुलगा अन्वय क्षेत्ररक्षण करताना (संग्रहित छायाचित्र)
-
ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथची याची भेट घेताना अन्वय आणि समित . (संग्रहित छायाचित्र)
बाप तसा बेटा ! चर्चा फक्त ज्युनियर द्रविडचीच
“छोटी The Wall बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे”
Web Title: Social media says small wall under construction after rahul dravids son samit scores 2nd double century in less than two months sas