• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. tendulkar kohli shastri lead cricket fraternitys response after rihanna greta extend support to farmers protest sas

रिहानाच्या पाठिंब्यानंतर क्रिकेटपटूंची ‘बॅटिंग’! सचिनपासून शास्त्री गुरूजींपर्यंत; अजिंक्य-विराटनेही दिली प्रतिक्रिया

रिहानाच्या पाठिंब्यानंतर क्रिकेटपटूंची ‘बॅटिंग’!

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० पेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सोशल मीडियातून आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. सर्वप्रथम प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग व पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर भारतातील काही क्रिकेटपटू आणि बॉलिवूडच्या मंडळींकडून 'ही भारताची अंतर्गत बाब' असल्याचं सांगत बाहेरच्यांनी आमच्यात हस्तक्षेप करु नये असं सुनावलंय...बघुया कोण काय म्हणालं?
    1/11

    दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० पेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सोशल मीडियातून आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. सर्वप्रथम प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग व पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर भारतातील काही क्रिकेटपटू आणि बॉलिवूडच्या मंडळींकडून 'ही भारताची अंतर्गत बाब' असल्याचं सांगत बाहेरच्यांनी आमच्यात हस्तक्षेप करु नये असं सुनावलंय…बघुया कोण काय म्हणालं?

  • 2/11

    सचिन तेंडुलकर : भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक बनू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ते त्यांनीच ठरवावं. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे. एक राष्ट्र म्हणून एकजूटीने राहण्याची गरज आहे.

  • 3/11

    विराट कोहली : या कठीण प्रसंगी आपण एकजूटीने राहण्याची गरज आहे. शेतकरी आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण घटक असून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तोपर्यंत आपण शांतता राखणे गरजेचे आहे.

  • 4/11

    शिखर धवन : “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं सध्या आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं.

  • 5/11

    गौतम गंभीर : बाहेरच्या शक्ती आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक दशकं त्यांनी आपल्यावर राज्य केलं. पण भारताने सगळ्यावर मात केली आणि पुढेही करेन. तुमची अब्जावधीची संपत्ती वापरा…सर्वश्रेष्ठ प्रयत्न करा तरी फरक पडणार नाही. कारण, हा नवीन भारत आहे.

  • 6/11

    हार्दिक पांड्या : एकजूटीने राहू…

  • 7/11

    रोहित शर्मा : जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची कायम महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू.

  • 8/11

    सुरेश रैना : देशात काही समस्या असतात. ज्या समस्यांची उत्तरे आज उद्या मिळू शकतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की बाहेरच्यांनी हस्तक्षेप करावा, अशा शब्दात रैनाने परदेशी सेलिब्रेटींना फटकारलं.

  • 9/11

    अनिल कुंबळे : जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवण्यास सक्षम आहे.

  • 10/11

    रवी शास्त्री : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की चर्चेने तो प्रश्न आम्ही सोडवू.

  • 11/11

    अजिंक्य रहाणे : एकजूटीने कोणत्याही समस्येवर तोडगा निघतो. त्यामुळे एकजूटीने राहू आणि आपले अंतर्गत प्रश्न सोडवू.

TOPICS
शेतकरीFarmers

Web Title: Tendulkar kohli shastri lead cricket fraternitys response after rihanna greta extend support to farmers protest sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.