मुथय्या मुरलीधरन – कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक ८०० बळी घेऊन इतिहास रचणारा श्रीलंकेचा माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरनने कसोटी कारकीर्दीच्या शेवटच्या चेंडूवर भारताच्या प्रग्यान ओझाची विकेट घेतली. सर्व प्रकारात एकत्रित १३४७ बळी घेण्याचा विक्रम मुरलीधरनच्या नावावर आहे. सर रिचर्ड हेडली – न्यूजीलंडचे दिग्गज माजी गोलंदाज सर रिचर्ड हेडली यांनी इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर डी मॅल्कम यांना बाद केले. लसिथ मलिंगा – लसिथ मलिंगा आपल्या यॉर्करसाठी ओळखला जातो. आपल्या वनडे कारकिर्दीच्या शेवटच्या चेंडूवर त्याने बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानची विकेट घेतली. ग्लेन मॅक्ग्रा – क्रिकेटच्या इतिहासात सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राने कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला माघारी धाडले होते. वनडे कारकिर्दीच्या शेवटच्या चेंडूवर त्याने पॉल निक्सन आणि टी-२० कारकिर्दीच्या शेवटच्या चेंडूवर पॉल कॉलिंगवूडला बाद केले होते. -
अॅडम गिलख्रिस्ट – या यादीमध्ये अॅडम गिलख्रिस्टचे नाव पाहून तुम्हाला धक्का बसेल. गिलख्रिस्ट आपल्या चपळ यष्टीरक्षणासाठी ओळखला जात होता. आयपीएल२०१३मधील शेवटच्या सामन्यात त्याने हरभजन सिंगची विकेट घेतली होती. त्याने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता.
PHOTOS : आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज तु्म्हाला ठाऊक आहेत का?
Web Title: International bowlers who picked up wickets on last ball of their careers adn