-
इंग्लंडने बाद फेरीत जर्मनीला २-० ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रहिम स्टरलिंगने ७५ व्या मिनिटाला, तर हॅरी केन याने ८६ मिनिटाला गोल झळकावत संघाला विजय मिळवून दिला. (Photo-Reuters)
-
विजयानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर चाहत्यांनी संघावर कौतुकाचा वर्षाव केला. (Photo-Reuters)
-
सामन्यानंतर ब्रिटनचा प्रिन्स विल्यम, कॅथरीन, डचेस ऑफ केंब्रिज आणि प्रिन्स जॉर्ज यांनी स्टँडमध्ये जल्लोष केला. (Photo-Reuters)
-
इंग्लंडच्या खेळाडूंनीही मैदानात फेरफटका मारत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. (Photo-Reuters)
-
उपांत्यपूर्व फेरीत युक्रेन विरुद्ध इंग्लंड सामना रंगणार आहे. मागच्या सात सामन्यात इंग्लंड युक्रेनवर वरचढ असल्याचं दिसून आलं आहे. (Photo-Reuters)
-
इंग्लंडने युक्रेनवर ७ पैकी ६ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. (Photo-Reuters)
Euro Cup 2020: जर्मनीवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांचा जल्लोष
इंग्लंडने बाद फेरीत जर्मनीला २-० ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रहिम स्टरलिंगने ७५ व्या मिनिटाला, तर हॅरी केन याने ८६ मिनिटाला गोल झळकावत संघाला विजय मिळवून दिला
Web Title: Euro cup 2020 england fans celebration