• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team india celebrates rahul dravids birthday in cape town watch photos adn

PHOTOS : टीम इंडियानं जल्लोषात साजरा केला लाडक्या राहुल द्रविडचा बर्थडे!

द्रविडच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

January 12, 2022 16:04 IST
Follow Us
  • भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आहे. तिसरी कसोटी ११ जानेवारीपासून सुरू झाली असून हा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खास आहे. ११ जानेवारी हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविडचा वाढदिवस आहे.
    1/6

    भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आहे. तिसरी कसोटी ११ जानेवारीपासून सुरू झाली असून हा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खास आहे. ११ जानेवारी हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविडचा वाढदिवस आहे.

  • 2/6

    द्रविड ४९ वर्षांचा झाला. काल द्रविडचा वाढदिवस टीम इंडियाने जल्लोषात साजरा केला. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे व्हायरल झाले.

  • 3/6

    १६ वर्षांच्या आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीत द्रविडने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून २५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. द्रविडने भारतासाठी १७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३६ शतके, ६३ अर्धशतकांसह १३२८८ धावा केल्या आहेत.

  • 4/6

    द्रविडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी ३४४ सामने खेळले आणि १२ शतके आणि ८३ अर्धशतकांच्या मदतीने १०८८९ धावा केल्या. एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ३१ धावा केल्या.

  • 5/6

    कसोटी फॉरमॅटमध्ये द्रविडच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. द्रविडने ३१,२५८ चेंडूंचा सामना केला.

  • 6/6

    द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. अशी कामगिरी पहिल्यांदाच करण्यासाठी भारत उत्सुक आहे.

TOPICS
राहुल द्रविडRahul Dravid

Web Title: Team india celebrates rahul dravids birthday in cape town watch photos adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.