-
आयपीएल २०२१ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबादच्या एका सामन्यानंतर सनरायजर्स हैदराबादच्या पराभवानंतर एका तरुणीचे निराश झालेले फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
त्यानंतर नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावादरम्यानचेही तिचे फोटो व्हायरल झाले. पण ही तरुणी नेमकी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना आजही आहे. तिचं नाव आहे काव्या मारन (Kaviya Maran). (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
इंडियन प्रीमियर लीग (IPL Auction 2022) लिलाव बेंगळुरूमध्ये नुकताच पार पडला. लिलावादरम्यान संघाच्या सीईओ काव्या मारन सनरायझर्स हैदराबादच्या टेबलावर दिसल्या.(फोटो सौजन्य – @IPL)
-
न्यूयॉर्क विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लिओनार्ड अॅन स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलेल्या काव्याला क्रिकेटची आवड आहे. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
एमबीए पूर्ण केल्यानंतर, काव्या मारन संघाची रणनीती विकसित करण्यासाठी सनरायझर्स हैदराबादसोबत काम करते. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतलेली काव्या केवळ लिलावादरम्यानच नाही तर आयपीएल सामन्यांदरम्यानही स्टेडियममध्ये दिसते. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
शिक्षण पूर्ण केल्यानंतर काव्याने वडील कलनिधी मारन यांच्या व्यवसायात प्रवेश केला. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
कलानिधी मारन हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे टीव्ही नेटवर्क सन टीव्हीचे मालक आहेत. या नेटवर्कमध्ये ३२ चॅनेल आणि २४ एफएम रेडिओ स्टेशन आहेत . (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
कलानिधी मारन यांची पत्नी कावेरी मारन देखील सनरायझर्स हैदराबादशी संबंधित आहे. ती देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या व्यावसायिक महिलांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
वडील मालक असूनही काव्या थेट त्यांच्या व्यवसायात सामील झाल्या नाहीत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या काव्याला फिरण्याचा आणि संगीत ऐकण्याचा विशेष छंद आहे. याशिवाय त्यांना मीडिया क्षेत्र आणि विमान वाहतूक क्षेत्रातही रस आहे. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
काव्याने सन टीव्ही नेटवर्कसोबत २०१९ मध्ये काम करण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
कलानिधी मारन यांनी त्यांच्या मुलीचा संचालक मंडळावर समावेश केला होता . (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
काव्या सन टीव्ही ग्रुपच्या डिजिटल मार्केटिंग टीममध्ये सक्रिय सहभागी आहे. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
-
सन NXT या डिजिटल विभागासाठीही ती जबाबदार आहे. काव्या सन ही एनएक्सटीची प्रमुख आहे. (फोटो सौजन्य – ट्वीटर)
IPL Auction 2022: लिलावादरम्यान सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेली कोण आहे ‘ही’ मिस्ट्री गर्ल?
Kaviya Maran: नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग लिलावादरम्यान तिचे फोटो व्हायरल झाले. ही तरुणी नेमकी कोण आहे?
Web Title: Ipl auction 2022 who is this mystery girl who has caught everyone attention during the auction ttg