Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2022 virat kohli rishabh pant ravindra jadeja kl rahul rohit sharma players who are underperforming prd

IPL 2022 | आयपीएलचा हंगाम जोमात, मात्र विराट कोहली, रविंद्र जाडेजासह ‘या’ भारतीय खेळाडूंकडून खराब कामगिरी

या हंगामात काही भारतीय खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. तर काही खेळाडू अजूनही आपली जादू दाखवू शकलेले नाहीत.

April 9, 2022 15:41 IST
Follow Us
  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊन दोन आठवडे झाले आहेत. या हंगामातील सर्वच सामने अटितटीचे होत आहेत. सर्वच संघांनी आतापर्यंत जवळपास तीन-तीन सामने खेळले आहेत. दरम्यान या हंगामात काही भारतीय खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. तर काही खेळाडू अजूनही आपली जादू दाखवू शकलेले नाहीत. या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजा आहे. जाडेजाची टीम चेन्नईने आतापर्यंत सर्वच सामने गमावले आहेत. जाडेजाने कर्णधारपदाला शोभेल अशी कामगिरी अद्याप केलेली नाही. आतापर्यंत तीन सामन्यात त्याने फक्त ४३ धावा केल्या असून गोलंदाजीमध्ये फक्त एक बळी घेऊन तब्बल ८० धावा दिल्या आहेत.
    1/5

    आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊन दोन आठवडे झाले आहेत. या हंगामातील सर्वच सामने अटितटीचे होत आहेत. सर्वच संघांनी आतापर्यंत जवळपास तीन-तीन सामने खेळले आहेत. दरम्यान या हंगामात काही भारतीय खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. तर काही खेळाडू अजूनही आपली जादू दाखवू शकलेले नाहीत. या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजा आहे. जाडेजाची टीम चेन्नईने आतापर्यंत सर्वच सामने गमावले आहेत. जाडेजाने कर्णधारपदाला शोभेल अशी कामगिरी अद्याप केलेली नाही. आतापर्यंत तीन सामन्यात त्याने फक्त ४३ धावा केल्या असून गोलंदाजीमध्ये फक्त एक बळी घेऊन तब्बल ८० धावा दिल्या आहेत.

  • 2/5

    यंदाच्या हंगामात खराब कामगिरी करणारा दुसरा संघ म्हणजे मुंबई आहे. हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून या संघाने आतापर्यंत सर्व म्हणजेच तीन सामने गमावले आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मादेखील आतापर्यंत चांगली कामगिरी करु शकलेला नाही. आतापर्यंत रोहितने तीन सामन्यांत एकूण ५४ धावा केल्या आहेत. यापैकी एका सामन्यात त्याने ४१ धावांची खेळी केलेली आहे.

  • 3/5

    दिल्ली कॅपीटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचीही हीच स्थिती आहे. ऋषभच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळलेले आहे. यापेकी दोन सामन्यांत दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागलेला असून एका सामन्यात या संघाने विजय संपादन केलेला आहे. ऋषभने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये ८३ धावा केल्या आहेत. पैकी एका सामन्यात ऋषभने ४३ धावांची खेळी केलेली आहे.

  • 4/5

    रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीदेखील आतापर्यंतच्या सामन्यात चांगला खेळ करु शकलेला नाही. कोहलीने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये ५८ धावा केल्या आहेत. पैकी एका सामन्यात त्याने ४१ धावा केलेल्या आहेत.

  • 5/5

    लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल हा स्टार खेळाडू आहे. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची ताकत त्याच्याकडे आहे. या हंगामात अजूनही केएल राहुल त्याच्या नावाला शोभेल असा खेळ करु शकलेला नाही. आतापर्यंतच्या चार सामन्यांत राहुलने आतापर्यंत १३२ धावा केल्या आहेत. यापैकी एका सामन्यात त्याने ६८ धावा केलेल्या आहेत.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Ipl 2022 virat kohli rishabh pant ravindra jadeja kl rahul rohit sharma players who are underperforming prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.