-
क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकर आज ४९ वर्षांचा झाला आहे. तो पन्नाशीत पदार्पण करतोय. त्याने क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक विक्रम रचले आहेत.
-
यापैकी काही विक्रम मोडीत निघाले. मात्र सचिनच्या नावावर असे काही विक्रम आहेत, जे अजूनही अबाधित आहेत.
-
यातील पहिला विक्रम म्हणजे एकदीवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही सचिनच्याच नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने १५९२१ धावा केलेल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर १८४२६ धावा आहेत. सचिनच्या या विक्रमाच्या आसपास अजून कोणताही फलंदाज पोहोचलेला नाहीये.
-
सचिनने शतकांचे शतक केलेले आहे. सचिनच्या नावावर १०० शतकांचा विक्रम आहे. त्याचा हा विक्रम अद्याप कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाही. विराट कोहलीने आतापर्यंत ७० शतकं केली आहेत. मात्र मागील दोन वर्षांपासून विराटला एकही शतक लगावता आलेले नाही. त्यामुळे सचिनचा शतकांचे शतक करण्याचा विक्रमदेखील अजूनही अबाधित आहे.
-
आतापर्यंत सर्वात जास्त एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिनच्याच नावावर आहे. सचिनने पूर्ण २२ वर्षे क्रिकेट खेळलेले आहे. या काळात त्याने आतापर्यंत ४४५ एकदिवसीय तर २०० कसोटी सामने खेळलेले आहेत. सचिनचा हा विक्रमदेखील अद्याप अबाधित आहे.
-
सचिन तेंडुलकरच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. तो आतापर्यंत सर्वात जास्त विश्वचषकामध्ये खेळलेला आहे. १९९६, १९९९, २००३, २००७ आणि २००११ अशा एकूण पाच विश्वचषकांमध्ये तो खेळलेला आहे. त्याचा हा विक्रमदेखील अद्याप अबाधित आहे.
संन्यास घेऊनही सचिन तेंडुलकरचे ‘हे’ विक्रम अद्याप अबाधित, विराट कोहलीही आहे खूप दूर
क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकर आज ४९ वर्षांचा झाला आहे. तो पन्नाशीत पदार्पण करतोय.
Web Title: Cricketer sachin tendulkar five records that can not broken prd