-
इंडियन प्रीमियर लीग युवा नवोदित क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी देण्यासाठी ओळखली जाते. आयपीएल २०२२ मध्ये असे काही खेळाडू आहेत. ज्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
-
स्टायलिश भारतीय अष्टपैलू खेळाडू टिळक वर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून मैदानात उतरला आहे. मुंबईने १९ वर्षीय टिळकला १.७ कोटी रूपयांना विकत घेतले आहे. वर्माने ११ डावांत १३६.३२ च्या स्ट्राइक रेटने ३३४ धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान एकापाठोपाठ एक वाजवी गोलंदाजी करत आहे. मोहसीन या आगोदर मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळत होता. मात्र, यंदा लखनऊने २० लाखांमध्ये विकत घेतले आहे. डाव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने केवळ सहा सामन्यांत १० बळी घेतले आहेत. खान ५.१९च्या वाजवी इकॉनॉमीवर धावा देत आहे, जे आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वात कमी आहे.
-
पंजाब किंग्जचा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा आपल्या पदार्पणात चांगली कामगिरी करत आहे. पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना शर्माने १६७ च्या स्र्ट्राइक रेटने सात डावात १६२ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने १८ चेंडून नाबाद ३८ धावा केल्या होत्या. ही त्याची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
-
दिल्लीतील युवा भारतीय अष्टपैलू खेळाडू आयुष बडोनी याने कामगिरी करून क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. लखनऊने २२ वर्षीय आयुषला २० लाख रुपयांमध्ये विकत घेतले आहे. आयुषने लखनऊसाठी १० सामने खेळले आहेत. आमि १२४.८० च्या स्ट्राइकने त्याने ७ डावांमध्ये १६१ धावा केल्या आहेत.
-
न्यूझीलंडच्या डेव्हन कॉनवेने याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी ६३ आणि ७५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १ सामना खेळल्यानंतर चेन्नईने त्याला बाहेर बसवले होते. मात्र, धोनी चेन्नईचा कर्णधार बनला आणि डेव्हॉन पुन्हा संधी देण्यात आली. त्याने आत्तापर्यंत चेन्नईसाठी ५ सामने खेळले आहेत. यंदाच्या मोसमात त्याने २३१ धावा काढल्या आहेत.
IPL 2022: ‘या’ खेळाडूंनी आपल्या पर्दापणातच वेधल जगाचं लक्ष, एका पेक्षा एक वरचढ
जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर आणि इतर अनेक क्रिकेटपटू आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आले आहेत.
Web Title: Most talented player in indian premier league 2022 dpj