
आयपीएल २०२२ पर्वात एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रोमहर्षक लढत झाली. या लढतीत बंगळुरु संघाचा रजत पटीदार हा फलंदाज चांगलाच तळपला.
संघ अडचणीत असताना त्याने धमाकेदार फलंदाजी केली आहे. त्याने फक्त ५४ चेंडूंमध्ये तब्बल ११२ धावा केल्या आहेत.
मैदानावर चौकार आणि षटकार यांचा पाऊस पाडत रजत पाटीदारने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
रजत पाटीदार प्लेऑफच्या सामन्यात शतक झळकावणारा बंगळुरु संघाचा पहिला फलंदाज ठरला आहे.
तसेच आयपीएलच्या इतिहासात एलिमिनेटर सामन्यात शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी एलिमिनेटर सामन्यात एकाही खेळाडूला शतकी खेळी करता आलेली नाही.
रजत पाटीदार प्लेऑफमध्ये शतक ठोकणारा पहिला अनकॅप्ड प्लेअर ठरला आहे.
तसेच त्याने आयपीएलच्या २०२२ या पर्वातील सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. त्याने ५४ चेंडूंमध्ये ११२ धावा केल्या. (सर्व फोटो- iplt20.com संकेतस्थळावरुन साभार)