• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. javelin champion neeraj chopra sets new national record in paavo nurmi games 2022 photos kak

Photos : १० सेकंद, ८९.३० मीटर भालाफेक अन् रुपेरी कामगिरी; नीरज चोप्राने रचला नवा राष्ट्रीय विक्रम

फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स २०२२ मध्ये नीरजने भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे.

June 15, 2022 13:09 IST
Follow Us
  • Neeraj Chopra news
    1/12

    ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

  • 2/12

    भालाफेकपटू नीरज चोप्राने एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे.

  • 3/12

    फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स २०२२ (Paavo Nurmi Games 2022) मध्ये नीरजने भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे.

  • 4/12

    या स्पर्धेत अवघ्या १० सेकंदात ८९.३० मीटर दूर भालाफेक करत नीरजने रौप्य पदकाची कमाई केली आहे.

  • 5/12

    विशेष म्हणजे नीरजने स्वत:चाच विक्रम मोडत नवा राष्ट्रीय रेकॉर्ड रचला आहे.

  • 6/12

    याआधी मागील वर्षी त्याने पतियालामध्ये ८८.०७ मीटर दूर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम केला होता.

  • 7/12

    त्यानंतर नीरजने ७ ऑगस्ट २०२१ रोजी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

  • 8/12

    आता पावो नूरमी गेम्समध्ये ८९.३० मीटर दूर भालाफेक केल्याने नीरजने नवा विक्रम केला आहे.

  • 9/12

    नीरज चोप्रा हा पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे.

  • 10/12

    टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा आहे.

  • 11/12

    या स्पर्धेनंतर नीरज फिनलॅण्डमधील ‘कुओर्तने गेम्स’मध्ये आणि डायमंड लीगच्या ‘स्टॉकहोम लेग’मध्ये सहभागी होणार आहे.

  • 12/12

    पुढील महिन्यात होणाऱ्या ‘जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ आणि ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धां’मध्येही नीरजकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. (सर्व फोटो : नीरज चोप्रा/ इन्स्टाग्राम)

TOPICS
क्रीडाSportsनीरज चोप्राNeeraj Chopraस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Javelin champion neeraj chopra sets new national record in paavo nurmi games 2022 photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.