-
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ट्विट करत कोहलीला पाठिंबा दिला आहे. विराटसोबतचा फोटो पोस्ट करत त्याने ही वेळही निघून जाईल, असे कॅप्शन दिले आहे.
-
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने फेसबुकवर कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने कोहलीला मजबूत राहण्याचा सल्ला दिला आहे.
-
विराट कोहलीला टी-२० मधून वगळण्याबाबत कपिल देव यांनी केलेल्या वक्तव्यावर बरीच चर्चा रंगली होती. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने यावर प्रतिक्रिया देत कोहलीला पाठिंबा दिला होता.
-
कोहलीच्या खराब फॉर्मबाबत दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केविन पीटरसन यानेही पाठिंबा दिला आहे. ”तु जे केलं आहे, ते अनेक जण फक्त स्वप्न पाहू शकतात. तु महान खेळाडू आहे” असे पीटरसने म्हटले होते.
-
विराट कोहली सद्या खराब फॉर्ममधून जात असताना रोहीत शर्माही त्याच्या समर्थानत आला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याने कोहलीला पाठिंबा दिला.
-
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही कोहलीला पाठिंबा दिला आहे. ”कपिल देव यांच्या मताचा आदर करतो. मात्र, 43 एकदिवसीय आणि 27 कसोटी शतके करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.” असे तो म्हणाला.
रोहीत शर्मा, बाबर आझमसह ‘या’ खेळाडूंकडून विराट कोहलीला पाठिंबा
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सद्या खराब फॉर्ममधून जात आहे. अशात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. मात्र, काही पाकिस्तानी क्रिकेटरसह अनेक खेळाडू कोहलीच्या समर्थनात आले आहे.
Web Title: Rohit sharma babar azam and various player support virat kohali spb