• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. world athletics championships 2022 javelin thrower neeraj chopra won silver medal rmm

Photos : आधी लय गमावली मग केलं जबरदस्त ‘कमबॅक’, नीरज चोप्राची ‘रौप्य’ पदकाला गवसणी

World Athletics Championships 2022 : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.

July 24, 2022 13:29 IST
Follow Us
  • World Athletics Championships 2022 : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
    1/9

    World Athletics Championships 2022 : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.

  • 2/9

    नीरज चोप्राने ८८.१३ मीटर अंतर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केलं.

  • 3/9

    लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

  • 4/9

    ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं.

  • 5/9

    नीरज चोप्राचा पाचवा आणि सहावा थ्रो फाऊल (Fouls) होता.

  • 6/9

    नीरज चोप्रासाठी ही एक चिंताजनक सुरुवात होती. तिसऱ्या फेरीनंतर नीरज ८२.३९ मीटर आणि ८६.३७ मीटर भालाफेकीसह तो चौथ्या स्थानावर होता.

  • 7/9

    पण, त्यानंतर नीरजने आपली लय परत मिळवली. त्यानं चौथ्या फेरीत ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्यानंतर तो शेवटच्या फेरीपर्यंत दुसऱ्या स्थानावर कायम होता.

  • 8/9

    नीरजनेने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर अंतर दूर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावलं होतं.

  • 9/9

    जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रुपेरी कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी स्पर्धेतील निकालावर समाधानी असून देशासाठी पदक जिंकल्याचा आनंद आहे, असं त्यानं म्हटलं आहे. तसेच पुढच्या जागतिक स्पर्धेत यापेक्षा उत्तम कामगिरी करू, असा विश्वासही त्यानं यावेळी व्यक्त केला. (सर्व फोटो सौजन्य- AP Photo/Gregory Bull)

TOPICS
क्रीडाSportsनीरज चोप्राNeeraj Chopra

Web Title: World athletics championships 2022 javelin thrower neeraj chopra won silver medal rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.