-
क्रिकेट खेळाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांच्या जोरावरच अनेक क्रिकेटपटूंनी प्रसिद्धी मिळवलेली आहे. मात्र काही क्रिकेटपटूंनी त्यांच्या सवयीमुळे स्वत:चे करिअर धोक्यात टाकले होते. काही क्रिकेटर्सना तर दारुचे व्यसन होते. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पहिल्या क्रमांकावर येतो.
-
त्याने २०१३ साली बर्मिंघममधील बारमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटला धक्काबुक्की केली होती.
-
त्यानंतर पुढे दोन वर्षे त्यांने दारूला स्पर्श केला नव्हता.
-
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यालादेखील दारुचे व्यसन होते.
-
दारुमुळेच पुढे त्याला एकदिवसीय सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले होते.
-
१९९९ साली सिडनीतील नाईट क्लबबाहेर एका अनोळखी व्यक्तीने त्याला धक्काबुक्की केली होती.
-
अँड्र्यू सायमंड्स हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होता.
-
२००९ साली इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यातील विजय साजरा करण्यासाठी त्याने प्रमाणापेक्षा जास्त मद्यप्राशन केले.
-
याच कारणामुळे त्याला तेव्हा संघाबाहेर ठेवण्यात आले होते.
-
मॉन्टी पानेसर हा इंग्लंडमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू होता. मात्र बेशिस्त, पार्टी करण्याची सवय यामुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागली.
-
त्याने एकदा लंडनमधील बारसमोर दोन बाऊन्सर्सवर लघवी केली होती. या घटनेनंतर तो कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही.
-
जेसी रायडर हा इंग्लंड संघातील उत्तम खेळाडू होता. मात्र दारूची सवय तसेच चकचकीत जीवन जगण्याच्या सवयीमुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. क्राइस्टचर्चमधील एका बारमध्ये त्याच्यावर एकदा जमावाने हल्ला केला होता. (सर्व फोटो- इंडियन एक्स्प्रेस आणि लोकसत्ता)
डेव्हिड वॉर्नर ते रिकी पॉन्टिंग, जाणून घ्या असे पाच खेळाडू ज्यांचे दारूच्या व्यसनामुळे करिअर आले होते धोक्यात
क्रिकेट खेळाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांच्या जोरावरच अनेक क्रिकेटपटूंनी प्रसिद्धी मिळवलेली आहे.
Web Title: Ricky ponting to andrew symonds 5 cricketer who fell in trap of alcohol and ruin career prd