-
सध्या यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पाच गडी राखून धूळ चारली.
-
या सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात धडाकेबाज खेळ करत विजय खेचून आणला.
-
या विजयानंतर भारतीय संघाचे देशभरात कौतूक केले जात आहे. मात्र या सामन्यात भारताचा विजय झालेला असला तरी आघाडीचे फलंदाज काही खास कामगिरी करू शकलेले नाहीत.
-
सलामीवीर केएल राहुल गोल्डन डकवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार राहुल शर्मादेखील त्याची कमाल दाखवू शकला नाही. अवघ्या १२ धावांवर तो झेलबाद झाला.
-
विराट कोहलीने तुलनेने चांगली कामगिरी केली. मात्र तो फक्त ३५ धावा करू शकला. दरम्यान, आगामी सामन्यात विराट आणखी चांगला खेळ करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-
३१ ऑगस्ट रोजी भारत-आणि हाँगकाँग यांच्यात लढत होणार आहे. तुलनेने भारत संघ हाँगकाँग संघापेक्षा सरस आहे. तरीदेखील विराट या सामन्यात धावांचा पाऊस पाडणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
-
या सामन्यात भारताचा विजय झाला तर भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा लढत होऊ शकते. मात्र त्यासाठी पाकिस्तानलाही आपला आगामी सामना जिंकावा लागेल.
-
हे सर्व गणित जुळून आल्यास येत्या ४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान आमनेसामने येऊ शकतात.
-
याआधी भारतीय खेळाडू हाँककाँगविरोधात पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहेत. विराट कोहलीदेखील चांगलीच मेहनत घेताना दिसतोय.
-
या सामन्यासाठी तो कसून सराव करतोय. तसेच शरीर स्वास्थ्यासाठी तो व्यायामदेखील करत आहे. विराटने नुकतेच जीममधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये विराट कोहली जीममध्ये वर्कआऊट करताना दिसतोय. याआधीही त्याने व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.
-
विराट कोहली मागील काही वर्षांपासून धावा करण्यासाठी झगडताना दिसतोय. आपयीएल २०२२ हंगामात तर त्याने खराब कामगिरी केली होती. याच कारणामुळे त्याने साधारण महिनाभर ब्रेक घेतला होता.
-
या कालावधित त्याने त्याच्यातील उणिवा, त्याच्यासोबत नेमकं काय घडतंय याचा अभ्यास केला. याच महिन्याभराच्या ब्रेकबद्दल विराटने सविस्तर भाष्य केले आहे.
-
माझे शरीर मला ब्रेक घ्यायला सांगत होते. मात्र माझ्याकडे खूप उर्जा आहे, असे मला वाटत होते. मी दहा वर्षात पहिल्यांदाच महिनाभर बॅटला हात लावला नाही, असे विराटने सांगितले.
PHOTO : पाकिस्तानला नमवलं, आता हाँगकाँगविरोधात लढण्यासाठी टीम इंडिया सज्ज, विराट कोहलीही घेतोय खास मेहनत!
सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात धडाकेबाज खेळ करत विजय खेचून आणला.
Web Title: Virat kohli workout before india vs hong kong match in asia cup prd