Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. bcci worried about player suffering from injury before t20 world cup spb

PHOTO : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढली; ‘हे’ पाच महत्त्वाचे खेळाडू आहेत दुखापतीने त्रस्त

आशिया चषकानंतर आता भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य टी-२० विश्वचषकावर आहे. मात्र, खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

September 9, 2022 21:38 IST
Follow Us
  • आशिया कप २०२२ मधील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव केला.
    1/15

    आशिया कप २०२२ मधील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव केला.

  • 2/15

    पाकिस्तानच्या विजयामुळे भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले.

  • 3/15

    आशिया चषकात या खराब प्रदर्शनानंतर आता भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य टी-२० विश्वचषकावर आहे.

  • 4/15

    १६ सप्टेंबरला रोजी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वी महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापती भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे.

  • 5/15

    भारताचे पाच प्रमुख गोलंदाज दुखापतीने त्रस्त आहेत. अशा स्थितीत टीम इंडिया विश्वचषक कसा जिंकणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

  • 6/15

    जसप्रीत बुमराह : जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. या दुखापतीमुळे त्याला आशिया कपमधूनही बाहेर व्हावे लागले.

  • 7/15

    बुमराह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे. बुमराह टी-२० विश्वचषकासाठी तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे.

  • 8/15

    हर्षल पटेल : बरगडीच्या दुखापतीमुळे हर्षल पटेलला आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. हर्षल पटेल सध्या एनसीएमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात सराव करतो आहे.

  • 9/15

    या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो मैदानात परतण्याची अपेक्षा आहे. हर्षल पटेल हा मीडियम पेसर असला तरी तो ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर जीवघेणा ठरू शकतो.

  • 10/15

    रवींद्र जडेजा : अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

  • 11/15

    जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याचे यशस्वी ऑपरेशन झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर रवींद्र जडेजाला २०२२च्या टी-२० विश्वचषकात खेळणे कठीण आहे.

  • 12/15

    आवेश खान : आवेश खानहीलाही ताप असल्यामुळे आशिया चषकातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

  • 13/15

    वेस्ट इंडिज दौऱ्यापासून आवेश खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात ५० हून अधिक धावा दिल्या होत्या. पण त्याची तब्येतही भारतीय संघासाठी चिंतेचे कारण आहे.

  • 14/15

    प्रसिद्ध कृष्णा : न्यूझीलंड-ए विरुद्धच्या सध्याच्या मालिकेसाठी प्रसिद्ध कृष्णा भारत-अ संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे कृष्णाला या मालिकेतून माघार घ्यावी लागली.

  • 15/15

    आता कृष्णाच्या बाहेर पडल्यानंतर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा भारत-अ संघात समावेश करण्यात आला आहे.

TOPICS
टी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024

Web Title: Bcci worried about player suffering from injury before t20 world cup spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.