• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. seven players can get place in indian team for t20i series against australia spb

PHOTO : ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी या ‘सात’ खेळाडूंना मिळू शकते भारतीय संघात स्थान

या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे.

September 11, 2022 20:15 IST
Follow Us
  • यंदा आशिया चषकात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. यावेळी भारतीय संघाला अंतिम सामन्यातही धडक मारता आली नाही. सुरुवातीला दोन्ही सामने जिंकून भारताने ग्रुप स्टेजमध्ये चांगली सुरूवात केली होती. मात्र, सुपर ४ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंके विरुद्ध मिळालेल्या पराभवामुळे त्याचा प्रवास संपुष्टात आला.
    1/9

    यंदा आशिया चषकात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. यावेळी भारतीय संघाला अंतिम सामन्यातही धडक मारता आली नाही. सुरुवातीला दोन्ही सामने जिंकून भारताने ग्रुप स्टेजमध्ये चांगली सुरूवात केली होती. मात्र, सुपर ४ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंके विरुद्ध मिळालेल्या पराभवामुळे त्याचा प्रवास संपुष्टात आला.

  • 2/9

    आशिया चषकानंतर आता टीम इंडिया या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित दोन सामने नागपूर (२३ सप्टेंबर) आणि हैदराबाद (२५ सप्टेंबर) येथे होणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कोणत्या भारतीय खेळाडूंना संघात स्थान मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 3/9

    ईशान किशन : इशान किशन हा आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. इशानने १९ टी-२० सामन्यांमध्ये १३१.१५ च्या स्ट्राइक रेटने ५४३ धावा केल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही सामन्यांमध्ये केलेल्या खराब प्रदर्शनामुळे आशिया चषक स्पर्धेत संधी मिळाली नव्हती. मात्र, आता ईशानची पुन्हा टी-२० संघात निवड होण्याची शक्यता आहे.

  • 4/9

    शाहबाज अहमद : शाहबाज अहमदचा गेल्या महिन्यात झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शाहबाज अहमदला संधी मिळण्याची शक्यता आहे.

  • 5/9

    संजू सॅमसन : संजू सॅमसनला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळू शकले नव्हते. संजू सॅमसन हा मधल्या फळीतही खेळू शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

  • 6/9

    शार्दुल ठाकूर : शार्दुल ठाकूरला यापूर्वी जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्याने संधीचे सोने केले आहे. शार्दुलने २५ टी-२० सामने खेळले असून त्याने ३३ बळी घेतले आहे.

  • 7/9

    वॉशिंग्टन सुंदर : सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर चांगला पर्याय ठरू शकतो.

  • 8/9

    शुभमन गिल -ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत शुभमन गिल आपले टी-२० पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याने या पूर्वी एकदिवसीय संघामध्ये पदार्पण केले आहे. अलिकडेच झालेल्या वेस्ट-इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याची निवड करण्यात आली होती. यावेळी त्याने काही चांगल्या खेळीही केल्या आहेत. आतापर्यंत त्याने ९ एकदिवसीय सामने खेळले असून त्याने १ शतक आणि ३ अर्धशतकांसह ७१.२९ च्या सरासरीने ४९९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात केलेल्या या कामगिरीनंतर त्याला आता टी-२० संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

  • 9/9

    राहुल त्रिपाठी – आयपीएल २०२२ मध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर राहुल त्रिपाठीने भारतीय टी-२० संघात स्थान मिळवले होते. अलीकडच्या काळात झालेल्या काही टी-२० मालिकेतही त्याचा सहभाग होता. मात्र, त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे त्याला आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

TOPICS
इंडियन क्रिकेटIndian Cricketक्रिकेटCricket

Web Title: Seven players can get place in indian team for t20i series against australia spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.