• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. asia cup 2022 final sri lanka win for 6th time defeat pakistan by 23 runs match score photos sdn

Photos: …अन् श्रीलंकेनं पाकिस्तानला धूळ चारत सहाव्यांदा आशिया चषक जिंकला; पाहा सामन्यातील रोमहर्षक क्षण

दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला.

Updated: September 12, 2022 10:07 IST
Follow Us
  • Sri Lanka vs Pakistan Asia Cup 2022 Final Photos
    1/12

    Asia Cup 2022 Final: एकीकडे देशात बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना आनंदाचे क्षण उपभोगण्याची संधी दिली. (AP Photo/Anjum Naveed)

  • 2/12

    वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू चमक, डावखुऱ्या भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी सरशी साधत सहाव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. (AP Photo/Anjum Naveed)

  • 3/12

    दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला. (AP Photo/Anjum Naveed)

  • 4/12

    त्यांच्याकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान (४९ चेंडूंत ५५) आणि इफ्तिकार अहमद (३१ चेंडूंत ३२) यांनी संयमाने फलंदाजी केली. (AP Photo/Anjum Naveed)

  • 5/12

    मात्र, मोक्याच्या क्षणी ते बाद झाल्यावर इतरांना फारसे योगदान देता आले नाही. (AP Photo/Anjum Naveed)

  • 6/12

    श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मदूशानने ३४ धावांत चार, तर हसरंगाने २७ धावांत तीन बळी मिळवले. (AP Photo/Anjum Naveed)

  • 7/12

    तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची अडखळती सुरुवात झाली. (AP Photo/Anjum Naveed)

  • 8/12

    त्यांची ५ बाद ५८ अशी स्थिती होती. (AP Photo/Anjum Naveed)

  • 9/12

    मात्र, राजपक्षेने एक बाजू लावून धरताना ४५ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ७१ धावांची खेळी केली. (AP Photo/Anjum Naveed)

  • 10/12

    त्याला हसरंगाची (२१ चेंडूंत ३६) उत्तम साथ लाभली. (AP Photo/Anjum Naveed)

  • 11/12

    त्यामुळे श्रीलंकेने २० षटकांत ६ बाद १७० अशी धावसंख्या केली. (AP Photo/Anjum Naveed)

  • 12/12

    (हेही पाहा : ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी या ‘सात’ खेळाडूंना मिळू शकते भारतीय संघात स्थान)

TOPICS
आशिया चषक २०२४Asia Cup 2023क्रिकेटCricketस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Asia cup 2022 final sri lanka win for 6th time defeat pakistan by 23 runs match score photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.