-
भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला आहे. तसेच एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयात ‘स्विंग क्वीन’ बनलेल्या रेणुका ठाकूरचे मोलाचे योगदान आहे.
-
रेणुका ठाकूरने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १० षटके टाकत ५७ धावा देत आणि चार गडी बाद केले. आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे रेणुकाने यजमान संघाच्या फलंदाजांची पॅव्हेलियनचा रस्ता दाखला.
-
रेणुकाने प्रथम सोफिया डंकलीला इनस्विंग बॉलवर बोल्ड केले. यानंतर एम्मा लॅम्बरही एलबीडब्ल्यू आऊट झाली.
-
इंग्लंडकडून सर्वाधिक (६५) धावा करणाऱ्या डॅनियल वॅटलाही रेणुकाने यॉर्करवर आऊट केले. तर सोफी एक्लेस्टन तिचा चौथा बळी ठरली.
-
रेणुकाने गेल्या वर्षी जुलैमध्ये एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने जवळपास प्रत्येक मोठ्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे.
-
आपल्या स्विंगच्या जोरावर तिने अनेक फलंदाजांना पाणी पाजले आहे. तिच्या स्विंगची जादू कॉमनवेल्थ गेम्समध्येही दिसली होती. या स्पर्धेत तिने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.
-
रेणुकाने आपल्या आयुष्यात खेळासाठी जे काही त्याग केले, त्याचे फळ तिला मिळत आहे.
-
यशाचा हा प्रवास रेणुकासाठी सोपा नव्हता. तीन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. रेणुकाच्या वडिलांना क्रिकेटची आवड होती.
-
रेणुकाने वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी क्रिकेट खेळण्यासाठी आपले घर आणि कुटुंब सोडले आणि धर्मशाला येथे सराव सुरू केला होता. तिथूनच तिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात केली होती.
PHOTO : क्रिकेट श्वास, क्रिकेट ध्यास! ‘स्विंग क्वीन’ म्हणून ओळख असलेल्या भारताच्या रेणूका ठाकूरने १३व्या वर्षीच सोडलं होतं घर
भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला आहे. तसेच एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
Web Title: Swing queen renuka thakur from indian womens cricket team spb