-
टेनिस कारकीर्दीचा निरोप घेताना अखेरचा सामना राफेल नदालच्या साथीने खेळायला मिळणे, हा सर्वात मोठा क्षण आहे. लेव्हर चषक २०२२ टेनिस स्पर्धेत अखेरची लढत फेडररची निरोपाची लढत असणार आहे. या लढतीत फेडरर नदालच्या साथीने खेळणार आहे. शेवटचा सामना नदालच्या साथीने खेळायला मिळण्यापेक्षा दुसरा सर्वोत्तम क्षण असूच शकत नाही, असे तो म्हणाला.
-
तो म्हणाला, “मी खेळण्याबद्दल थोडा ‘चिंताग्रस्त’ आहे, कारण मी इतके दिवस खेळलो नाही.” “मला आशा आहे की मी थोडा स्पर्धात्मक होऊन खेळू शकेन,” पुढे तो असेही म्हणाला की, “गुडघ्याच्या अनेक शस्त्रक्रियांनंतर माझा ताकद कमी झाली आहे.”
-
फेडररने गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर घोषणा केली की तो लेव्हर चषकनंतर निवृत्त होणार आहे. १९९० मध्ये सुरू झालेल्या कारकिर्दीत या खेळाडूने २०२० पर्यंत २० ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप आणि इतर स्पर्धांमध्ये ८३ विजेतेपदे जिंकली आहेत.
-
लेव्हर चषक २०२२ शुक्रवार २३ सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि रविवार २५ सप्टेंबर रोजी संपेल. लेव्हर चषक २०२२ लंडनमधील ओ२ एरिना येथे खेळवला जाईल. लेव्हर चषक २३ सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता सुरू होईल. लेव्हर चषक २०२२चे भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारण केले जाईल.
-
लेव्हर चषक सुरू होण्यापूर्वी, रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच आणि अँडी मरे यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही छायाचित्रे शेअर केली. या फोटोंमध्ये हे चार दिग्गज एकत्र दिसत आहेत. चाहते या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत आणि या खेळाडूंना ‘बिग फोर’ म्हणत आहेत. एका वापरकर्त्यावर टिप्पणी करताना लिहिले की, ६६ ग्रँड स्लॅम खिताब एका चित्रात एकत्र आहेत.
-
लेव्हर चषकचा हा पाचवा संस्करण असेल, ज्यामध्ये संघ युरोपचा सामना संघ जगाशी होईल. फेडररच्या कारकिर्दीतील प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे हेही सहभागी होणार आहेत. त्याचवेळी, एकेरी लढतींमध्ये कॅस्पर रुडचा सामना सौकशी, स्टेफानोस त्सित्सिपासचा सामना डिएगो श्वार्टझमन आणि अँडी मरेचा अॅलेक्स डी मिनौरशी सामना होईल.
रॉजर फेडरर टेनिस कारकिर्दीतील शेवटचा सामना राफेल नदालच्या साथीने लेव्हर चषक २०२२ मध्ये जोडीदार म्हणून आहे खेळणार , फोटो पहा…
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या लेव्हर चषक स्पर्धेनंतर टेनिसला अलविदा करणार आहे.
Web Title: Roger federers last match will be doubles with rafael nadal as partner at laver cup 2022 see pics avw