-
हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू असून त्याला संघातील काही खेळाडू हे ‘कुम्फू पांड्या’ म्हणून ओळखतात. हे नाव त्याला तो खूप मोठे षटकार मारतो आणि अडचणीच्या वेळी विकेट्स काढून देतो म्हणून पडले आहे. त्याने त्याप्रकारची जर्सी घातली होती.
-
भारताचा सलामीवीर शिखर धवन याला सगळे लाडाने संघातील खेळाडू हे ‘गब्बर’ असे म्हणतात. कारण त्याच्या पिळदार मिश्या हे त्यामागचे कारण आहे. तो नेहमी शतक झाले किंवा झेल पकडला तर तो ले पंगा ची स्टाईल करतो. ती प्रो-कब्बडीमध्ये फेमस आहे.
-
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला ‘रो-हिट’ शर्मा असे नाव ठेवले आहे. कारण त्याच्यासारखे षटकार कोणीच मारू शकत नाही. तो खूप क्लीन हिट मारतो. त्याची बायको रितिका त्याला लाडाने’रो’ असे म्हणते.
-
भारताचा सध्या फेममध्ये असलेला अक्षर पटेल याला सगळ्यांनी‘बापू’ असे नाव ठेवले आहे. कारण तो मुळातच वयापेक्षा मोठा वागतो. संवाद करताना देखील तो गुजराती आणि हिंदीमध्ये करतो. म्हणून सगळे ताल धरत त्याला लाडाने हे चिडवतात.
-
भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला ‘चिकू’ असे लाडाने म्हणतात. त्याला हे नाव महेद्रसिंग धोनीने दिले आहे. कारण त्याची चेहरापट्टी गोल आहे. त्यानंतर अनुष्कासह सगळेच त्याला चिकू म्हणून आवाज देतात.
-
महेद्रसिंग धोनी ‘बस नाम ही काफी है’, त्याची अशी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही पण तरी देखील तो भारताच यशस्वी माजी यष्टीरक्षक कर्णधार आहे. त्याला ही लाडाने सगळे त्याचे चाहते, संघातील सहकारी आणि माध्यमे सुद्धा ‘माही’ म्हणून संबोधतात.
-
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला लाडाने ‘जस्सी’ असे आवाज देतात. तो सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याचा यॉर्कर हा खूप प्रसिद्ध आहे. म्हणून त्याला ‘जस्सी तुस्सी ग्रेट हो’ असे म्हणतात.
-
शार्दूल ठाकूर हा देखील काही कालावधीतच खूप यशस्वी अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. भारताला जेव्हा कधी गोलंदाजीत किंवा फलंदाजीत गरज असेल तो नेहमी धावून येतो. इंग्लडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने महत्त्वाच्या क्षणी अर्धशतकी खेळी केली होती म्हणून त्याला ‘लॉर्ड’ ठाकूर असे टोपणनाव पडले आहे.
-
डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजा हा सुद्धा भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे. पण सध्या तो सुद्धा दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्याला ‘सर’ जडेजा या नावाने सगळे ओळखतात कारण तो क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी या सर्वात निपुण आणि तरबेज आहे. संजय मांजरेकर यांनीच त्याला हे नाव दिले आहे.
PHOTO: तुम्हाला माहिती आहेत का या भारतीय क्रिकेट खेळाडूंची टोपणनावे, एकदा नक्की पाहा आणि वाचा
भारतीय क्रिकेट संघात काही असे खेळाडू आहेत जी त्यांच्या टोपणनावाने ओळखले जातात. त्यातील काही प्रसिद्ध खेळाडूंच्या टोपणनावांची माहिती दिली आहे.
Web Title: Photo do you know the nicknames of these indian cricket players if not then watch and read avw