-
IND vs PAK: टी-२० विश्वचषकात २३ ऑक्टोबर रोजी पांरपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानचे पाच खेळाडू भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
-
मोहम्मद रिझवान सध्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारी पहिल्या स्थानावर आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून शेवटच्या १० सामन्यात त्याने ६ अर्धशकते झळकवली आहेत.
-
शाहीन आफ्रीदी दुखापतीमुळे आशिया चषकातून संघबाहेर असलेल्या शाहीन आफ्रीदीचे पुन्हा संघात आगमन झाले आहे. ऑस्ट्रेलियातील वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर शाहीन आफ्रिदी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
-
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारीस रौफही १५० किमी/प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. आशिय चषक आणि इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत रौफही चांगले प्रदर्शन केले आहे.
-
ऑलराऊंडर मोहम्मद नवाजही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत नवाजने उत्तम प्रदर्शन करत न्युझीलंडला मात दिली होती. आशिया चषकातही त्यांनी पाकिस्ताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
-
कर्णधार बाबर आझम सध्या फॉर्ममध्ये नसला, तरी तो भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. तो सध्या आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.
T20 World Cup 2022 : आगामी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचे ‘हे’ पाच खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी
IND vs PAK: टी-२० विश्वचषकात २३ ऑक्टोबर रोजी पांरपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान यांच्या सामना रंगणार आहे. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानचे पाच खेळाडू भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
Web Title: T20 world cup 2022 ind vs pak five pakistan players may create hurdals for indian team spb