Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. lionel messi the king of records lionel messi broke diego maradonas record avw

Lionel Messi: विक्रमांचा बादशाह! लिओनेल मेस्सीने दिएगो मॅराडोनाचा रेकॉर्ड तोडला

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने दिग्गज खेळाडू दिएगो मॅराडोनाचा फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मागे टाकत नवीन विक्रम प्रस्थपित केला.

December 4, 2022 18:04 IST
Follow Us
  • Messi breaks Maradona's record in his 1000th match
    1/12

    अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने विश्वचषकात ८ गोल करणाऱ्या दिग्गज दिएगो मॅराडोनाला मागे टाकत आपला ९वा गोल केला. मेस्सीने अर्जेंटिनासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम-१६ च्या सामन्यात पहिला गोल केला आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

  • 2/12

    अंतिम १६च्या फेरीतील अर्जेंटिनाचा हा पहिला गोल ठरला. या गोलमुळे तो अर्जेंटिनासाठी विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला, आता गॅब्रिएल बतिस्तुतापेक्षा फक्त एक गोल मागे आहे.

  • 3/12

    अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने आपला १०००वा सामना सार्थकी लावला. अर्जेंटिनाने अंतिम-१६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाकडून कर्णधार लिओनेल मेस्सी, जुलिआन अल्वारेझ यांनी गोलं केला.

  • 4/12

    २१ व्या शतकात अर्जेंटिनासाठी सलग विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करणारा मेस्सी अर्जेंटिनाचा तिसरा खेळाडू ठरला. मेस्सीने १६ ऑक्टोबर २००४ रोजी पहिला सामना खेळला आणि ३ डिसेंबर २०२२ रोजी त्याने १००० वा सामना खेळला. यादरम्यान, त्याने अनेक मोठे विक्रम केले आणि जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.

  • 5/12

    स्काय स्पोर्ट्स सोबत बोलताना मेस्सीने सांगितले की, “संपूर्ण अर्जेंटिनाला येथे यायला आवडेल, पण ते शक्य नाही. मला वाटते की आमच्यात असलेले हे बंधन, संघटन, अतिशय सुंदर आहे. या आश्चर्यकारक पण तितक्याच सुखद भावना आहेत. त्या सर्वांसोबत आनंदाचे हे सुंदर क्षण सामायिक करताना मला खरोखर आनंद होत आहे.”

  • 6/12

    अर्जेंटिनाच्या स्टारने संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर गर्दी करणार्‍या चाहत्यांचे कौतुक केले आणि घरी बसून खेळांचा आनंद घेत असलेल्या फुटबॉल चाहत्यांचाही उल्लेख केला.

  • 7/12

    मेस्सी चाहत्यांच्या प्रतिसादाबाबत बोलताना म्हणतो की, “येथे प्रत्येक सामन्यात आमच्यासोबत राहण्यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत. मला माहित आहे की त्यांना अर्जेंटिनामध्ये परतण्याचा किती आनंद होतो. ते जे प्रसारित करतात ते अविश्वसनीय आहे, उत्कटता, त्यांची ऊर्जा, त्यांचा आनंद यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. हे अविश्वसनीय आहे.”

  • 8/12

    मेस्सीने अर्जेंटिनाचे त्यांच्या चाहत्यांशी असलेले नातेसंबंध अतिशय सुंदररित्या परिभाषित केले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघाच्या विजयानंतर सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या अतूट पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले.

  • 9/12

    अर्जेंटिनाकडून कर्णधार लिओनेल मेस्सी, जुलिआन अल्वारेझ यांनी गोलं केला. तर ऑस्ट्रेलियाला खाते देखील अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडेसनेच उघडून दिले. त्याने ७७व्या मिनिटाला स्वयम गोल केला. आता अर्जेंटिनाचा क्वार्टर फायनलमध्ये नेदरलँडशी मुकाबला होणार आहे.

  • 10/12

    लिओनेल आंद्रेस मेस्सी हा अर्जेंटिनाचा व्यावसायिक फुटबॉलपटू आहे जो लीग १ क्लब पॅरिस सेंट-जर्मेन साठी फॉरवर्ड म्हणून खेळतो आणि अर्जेंटिना राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. त्याला जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू मानले जाते.

  • 11/12

    चाहते त्याला सर्व काळातील सर्वोतम महान खेळाडूंपैकी एक मानतात. मेस्सीने २०२० मध्ये विक्रमी सात बॅलन डी’ओर पुरस्कार, विक्रमी सहा युरोपियन गोल्डन शूज जिंकण्याबरोबरच, त्याची बॅलन डी’ओर ड्रीम टीममध्येही निवड झाली.

  • 12/12

    २०२१ मध्ये बार्सिलोना क्लब सोडेपर्यंत, मेस्सीने २००४ पासून त्याची संपूर्ण व्यावसायिक कारकीर्द त्यात घालवली (२००४ ते २०२१ पर्यंत बार्सिलोनासोबत मेस्सी). येथे त्याने क्लब-विक्रमी ३५ ट्रॉफी जिंकल्या, ज्यात दहा ला लीगा विजेतेपद, सात कोपा डेल रे जेतेपद आणि चार UEFA चॅम्पियन्स लीगचा समावेश आहे. एक विपुल ऑन-फिल्ड गोलस्कोरर आणि सर्जनशील प्लेमेकर, मेस्सीने बार्सिलोनासाठी ५२० सामने विक्रमी ४७४ गोल केले. ८० गोलसह सह दक्षिण अमेरिकन पुरुष खेळाडूकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

TOPICS
फिफाFIFAफुटबॉलFootballलिओनेल मेस्सीLionel Messiस्पोर्ट्स न्यूजSports News२०२२ फिफा विश्वचषक2022 Fifa World Cup

Web Title: Lionel messi the king of records lionel messi broke diego maradonas record avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.