-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने (Team india) दमदार प्रदर्शन केले आहे.
-
भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ६ वेळा ४०० च्या वर धावा केल्या आहेत.
-
भारतीय संघाने सर्वोच्च धावसंख्या २०११ मध्ये केली होती. चला तर जाणून घेऊया भारतीय संघाने कोणत्या संघासोबत ही विशेष कामगिरी केली आहे. पाहा संपूर्ण यादी.
-
भारत vs बर्म्युडा २००७: हा सामना एकदिवसीय विश्वचषकाचा सामना होता. ज्यात टीम इंडियाने बर्म्युडा विरुद्ध ४१३ धावा केल्या व २५७ धावांनी विजय मिळवला.
-
भारत vs श्रीलंका २००९: भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना खूपच रोमांचक होता. या सामन्यात टीम इंडियाने ४१४ धावा केल्या व विजय मिळवला.
-
भारत vs दक्षिण आफ्रिका २०१०: भारताने हा सामना १५३ धावांनी जिंकला आणि या सामन्यात टीम इंडियाने ४०१ धावा केल्या. या सामन्यात सचिन तेंडुलकरने नाबाद २०० धावा करून वनडे क्रिकेटच्या इतिहासातील पहिले द्विशतक झळकावले.
-
भारत vs वेस्टइंडीज २०११: या सामन्यात टीम इंडियाने ४१८ धावा केल्या. ही टीम इंडियाची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने २१९ धावांची खेळी केली. यात वेस्ट इंडिजला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
-
भारत vs श्रीलंका २०१४: ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १५३ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने या सामन्यात ४०४ धावा केल्या. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक २६४ धावा केल्या होत्या.
-
भारत vs बांगलादेश २०२२: भारत आणि बांगलादेश यांच्यात चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ४०८ धावा केल्या. या सामन्यात इशान किशनने २१० आणि विराट ११३ धावा केल्या व विजय मिळवला. (फोटो सौजन्य-indian express)
Team India Photos: धडाकेबाज फलंदाजी करुन भारताने किती वेळा ४०० धावांचा टप्पा केला पार? पाहा संपूर्ण यादी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने (Team india) दमदार प्रदर्शन केले असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेकवेळा ४०० च्या वर धावा केल्या आहेत. चला तर जाणून घेऊया भारतीय संघाने कोणत्या संघासोबत ही विशेष कामगिरी केली आहे. पाहा संपूर्ण यादी.
Web Title: How many times has the indian cricket team crossed the 400 run mark in odi cricket see the full list pdb