-
सूर्यकुमार यादवसाठी हे वर्ष चांगले गेले आहे. सूर्याच्या बॅटने यावर्षी ३१ सामन्यांमध्ये ४६.५६ च्या सरासरीने आणि १८७.४३ च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने ११६४ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
सूर्याने विश्वचषकात तीन अर्धशतकेही झळकावली होती. त्यामुळे टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ साठी नामांकन मिळाले आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा टी-२० विश्वचषकातील मालिकावीर आणि अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. करणने यावर्षी १० सामन्यात ६७ धावा केल्या, तर २५ बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याला देखील नामांकन मिळाले आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
मोहम्मद रिझवानचे टी-२० क्रिकेटमध्ये सलग दुसरे वर्ष चांगले होते. गतवर्षी विक्रमी १३२६ धावा करणाऱ्या या यष्टीरक्षक फलंदाजाने २०२२ मध्ये ९९६ धावा केल्या. त्यामुळे त्याला देखील टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ साठी नामांकन मिळाले आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाचा देखील या यादीत समावेश आहे. या खेळाडूने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जगभरात प्रसिद्धी मिळवली. रझाने २४ सामन्यात ७३५ धावा केल्या आणि २५ बळीही घेतले आहेत. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
आयसीसीने पुरूषांच्या इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ पुरस्कारासाठी ४ खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. ज्यामध्ये भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगचा समावेश आहे. त्याने २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८,.१२च्या सरासरीने ३३ विकेट घेतल्या आहेत. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज फिन ऍलनने ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. फिन ऍलनने यावर्षी टी-२० क्रिकेटमध्ये १५५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ४११ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानने आशिया कपमध्ये धमाकेदार फलंदाजी करत आपली झलक दाखवली. त्याने वनडेमध्ये ४३१ आणि टी-२० मध्ये ३६७ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला देखील नामांकन मिळाले आहे. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
मार्को जॅन्सनने कॅलेंडर वर्षात दक्षिण आफ्रिकेसाठी केवळ १३.५० च्या सरासरीने १४ कसोटी विकेट घेतल्या आहेत. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यांवर यश मिळवले आहे. त्याने न्यूझीलंडमध्ये नऊ कसोटी विकेट घेतल्या. (फोटो सौजन्य – ट्विटर)
ICC 2022 Awards: टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर आणि इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयरसाठी सूर्या-अर्शदीपसह ‘या’ खेळाडूंना मिळाले नामांकन
ICC Awards Updates: आयसीसीने पुरुषांच्या टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर आणि इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ साठी नामांकन जाहीर केले आहे. या दोन्ही पुरस्कांरासाठी प्रत्येकी चार खेळाडूंना नामांकन मिळाले आहे.
Web Title: Surya arshdeep among others nominated for t20 cricketer of the year and emerging cricketer of the year awards in icc 2022 vbm