-
दिल्ली कॅपिटल संघाचा कर्णधार ऋषभ पंत अपघात झाला आहे. त्यामुळे तो यंदा आयपीएल २०२३ मध्ये सहभागी होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे खालील चारपैकी एक खेळाडू त्याची जागा घेऊ शकतो. (फोटो – सौजन्य ट्विटर)
-
भारतीय संघाचा अंडर-१९ विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉ देखील या भूमिकेसाठी प्रमुख दावेदार आहे. या २३ वर्षीय खेळाडूने यापूर्वी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवलेले नाही. (फोटो – सौजन्य ट्विटर)
-
त्याने स्थानिक क्रिकेट संघात त्याने मुंबईचे यशस्वी नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०२०-२१ विजय हजारे ट्रॉफीमध्ये विजेतेपद पटकावले आणि रणजी ट्रॉफीमध्ये उपविजेतेपदही पटकावले आहे. (फोटो – सौजन्य ट्विटर)
-
आयपीएल २०२३ मिनी लिलावात दिल्ली कॅपिटल्सने मनीष पांडेला २.४ कोटी रुपयांना विकत घेतले. तो आयपीएल २०२३ मध्ये संघाचे नेतृत्व करू शकतो. (फोटो – सौजन्य ट्विटर)
-
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने कर्नाटकचे नेतृत्व केले आहे. आयपीएलच्या १५ सीझनमध्ये खेळलेला दिल्ली कॅपिटल्स संघातील तो एकमेव खेळाडू आहे. (फोटो – सौजन्य ट्विटर)
-
ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएलचा प्रचंड अनुभव आहे. पंतऐवजी कर्णधारपदाच्या शर्यतीत तो आघाडीवर असेल. (फोटो – सौजन्य ट्विटर)
-
त्याने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले असून २०१६ मध्ये संघाला विजेतेपदही मिळवून दिले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर कर्णधारपदाची बंदी घातली असली तरी ती आयपीएलमध्ये लागू होत नाही. (फोटो – सौजन्य ट्विटर)
-
मिचेल मार्शलाही आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभव नाही. पण तो आयपीएल २०२३ मध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करताना दिसू शकतो. (फोटो – सौजन्य ट्विटर)
-
३१ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला २०१० च्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा अनुभव आहे. त्याने ऑस्ट्रेलियन देशांतर्गत क्रिकेटमध्ये संघांचे नेतृत्व केले आहे. (फोटो – सौजन्य ट्विटर)
Delhi Capitals Captaincy: ऋषभ पंतच्या गैरहजेरीत कर्णधार पदासाठी ‘या’ खेळाडूंमध्ये पाहिला मिळणार चढाओढ
Delhi Capitals Captaincy: ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी मोठा अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे आयपीएल २०२३ मध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होण्यासाठी काही खेळाडूंमध्ये चढाओढ पाहिला मिळू शकते.
Web Title: In rishabh pants absence prithvi manish pandey mitchell marsh warner will be competing for the captaincy of delhi capitals vbm