• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team india meets jr ntr before the first odi the indian cricketers met jr ntr and the rrr team and congratulated rrr on his global success avw

Team India meets Jr. NTR: न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वन डे आधी टीम इंडिया पोहोचली RRR स्टार ज्युनियर एनटीआरच्या भेटीला

पहिल्या वनडे आधी, भारतीय क्रिकेटपटूंनी ज्युनियर एनटीआर आणि RRR टीमची भेट घेतली आणि RRR च्या जागतिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

January 17, 2023 21:30 IST
Follow Us
  • Team India meets Jr. NTR Before the first ODI the Indian cricketers met Jr. NTR and the RRR team and congratulated RRR on his global success
    1/9

    भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूंनी मंगळवारी ‘RRR’ स्टार ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. हा लोकप्रिय अभिनेता सुपर-हिट मूव्हर ‘RRR’ मध्ये मुख्य भूमिकेत होता आणि त्यांनी अलीकडेच ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ श्रेणीमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला होता.

  • 2/9

    RRR च्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या यशानंतर, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी ज्युनियर एनटीआरला भेटून त्यांचे अभिनंदन केले. हैदराबादमध्ये खेळल्या जाणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी खेळाडूंनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर केले.

  • 3/9

    ज्युनियर एनटीआर यांच्या सोबत‘द स्काय’ सुर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देवीशा शेट्टी यांनी फोटोसाठी पोझ दिली. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करत सूर्याने त्यांचे RRR च्या यशासाठी अभिनंदन केले. तर ज्युनियर एनटीआर यांनी त्याचे आभार मानत आगामी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

  • 4/9

    युजवेंद्र चहलनेही ज्युनियर एनटीआर यांची भेट घेतली. त्याची पत्नी धनश्रीसाठी एका नोटवर स्वाक्षरी घेतली. चहलच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मॅन ऑफ मास ज्युनियर एनटीआरला भेटून खरोखर आनंद झाला. गोल्डन ग्लोब जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आम्हा सर्वांना अभिमान आहे.”

  • 5/9

    इशान किशनने देखील ज्युनियर एनटीआर सोबतचा फोटो पोस्ट करत ट्विटरवर लिहिले, “सर (@tarak9999) तुम्हाला भेटून खूप छान वाटले तुमच्या सोबत चांगला वेळ घालवता आला आणि तुमच्या यशाबद्दल पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो.”

  • 6/9

    शुबमन गिलने ज्युनियर एनटीआर सोबतचा फोटो पोस्ट करत ट्विटरवर लिहिले, “सर (@tarak9999) सोबतचा फोटो आणि तुमच्या गोल्डन ग्लोबच्या यशाबद्दल पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो.”

  • 7/9

    भारतीय संघ १८ जानेवारी २०२३ पासून न्यूझीलंडविरुद्ध ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामने खेळणार आहे. त्याकरिता भारतीय संघ एकदिवस आधीच हैदराबाद येथे पोहोचले आहेत.

  • 8/9

    न्यूझीलंडचा संघ देखील या सामन्यासाठी भारतात पोहोचला असून हैदराबाद येथे उतरताच त्यांनी फोटो पोस्ट केले आहेत. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम असणार आहे.

  • 9/9

    दोन्ही संघ हैदराबाद येथे पोहोचताच सराव करण्यासाठी मैदानात उतरलेले होते. त्याची काही क्षणचित्रे दोन्ही संघांनी शेअर केली आहेत. विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्ही कर्णधार आपल्या संघाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतील.

TOPICS
ओडीआयODIटीम इंडियाTeam Indiaन्यूझीलंड टीमNewzealand Teamभारत विरुद्ध न्यूझीलंडIndia vs New Zealand

Web Title: Team india meets jr ntr before the first odi the indian cricketers met jr ntr and the rrr team and congratulated rrr on his global success avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.