Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. shubham gill hit double century against new zealand know the batsmen have scored double century in international cricket spb

IND vs NZ : क्लासच..! शुबमन गिलची वनडेत डबल सेंच्युरी; आत्तापर्यंत ‘या’ फलंदाजांनी केलाय हा भीमपराक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्या खेळाडूंनी द्विशतक झळकावले आहे? जाणून घ्या.

January 18, 2023 18:39 IST
Follow Us
  • International cricket double century player list
    1/9

    भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज शुबमन गिलनं न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार द्विशकत झळकावलं आहे. केवळ १४५ चेंडूंमध्ये त्याने ही कामागिरी केली. या कामगिरीसह शुबमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्या खेळाडूंनी हा भीमपराक्रम केला आहे, जाणून घेऊया.

  • 2/9

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावण्याचा विक्रम किक्रेट देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरच्या नावे आहे. सचिनने २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना २०० धावा केल्या होत्या.

  • 3/9

    सचिनच्या द्विशतकाच्या एक वर्षानंतरच भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने हा विक्रम मोडीत काढला. सेहवागने २०११ साली वेस्टइंडीजविरुद्ध खेळताना २१९ घावा काढत वेस्टइंडीज गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली होती.

  • 4/9

    सचिन आणि सेहवागनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरे द्विशतक झळकावण्याचा विक्रम भारतीय संघातील फलंदाज रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०९ धावांची खेळी केली होती.

  • 5/9

    त्यानंतर २०१४ साली पुन्हा एकदा रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध खेळताना २६४ धावांची खेळी केली. २०१७ मध्येही रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध खेळताना २०८ धावांची खेळी करत तीसरे द्विशतक झळकावले. विशेष म्हणजे आंतराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक द्विशतक झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे.

  • 6/9

    वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलनेही २०१५ साली झिम्बॉंबेविरुद्ध खेळताना २१५ धावांची खेळी करत आपले पहिले द्विशतक झळकावले होते.

  • 7/9

    २०१५ मध्ये न्युझीलंडचा फलंदाज मार्टीन गप्टीलनेही वेस्टइंडीज विरुद्ध खेळताना २३७ धावांची धमाकेदार खेळी केली होती.

  • 8/9

    २०१८ साली पाकिस्तान क्रिकेट संघातील फलंदाज फखर जमाननेही झिम्बॉंबेविरुद्ध खेळताना २१० धावा करत द्विशतक झळकावले.

  • 9/9

    द्विशतक झळकवणाऱ्यांच्या यादीत आणखी एक नाव म्हणजे ईशान किशन. ईशानने गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना २१० धावांची खेळी करत द्विशतक लगावले होते.

TOPICS
क्राईम न्यूजCrime Newsभारत विरुद्ध न्यूझीलंड

Web Title: Shubham gill hit double century against new zealand know the batsmen have scored double century in international cricket spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.