• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs nz odi series big shock to australia due to indias series win team india will benefit in ranking vbm

IND vs NZ ODI Series: भारताच्या मालिका विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; टीम इंडियाला क्रमवारीत होणार फायदा

IND vs NZ ODI Series Updates: शनिवारी दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करतान न्यूझीलंडचा संघ अवघ्या १०८ धावांवर गारद झाला. या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २०.१ षटकांत २ गडी गमावून विजय मिळवला. त्यामुळे भारताने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आता भारताकडे क्लीन स्वीप करण्याची संधी आहे

January 21, 2023 21:37 IST
Follow Us
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा निर्णय झाला आहे. सलग दोन एकदिवसीय सामने जिंकून भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. (फोटो-सौजन्य ट्विटर)
    1/9

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा निर्णय झाला आहे. सलग दोन एकदिवसीय सामने जिंकून भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 2/9

    पहिल्या सामन्यात भारताने १२ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 3/9

    किलर गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला अवघ्या १०८ धावांत गारद केले. ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ तर मिचेल सँटनरने २७ धावा केल्या. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 4/9

    गेल्या सामन्याचा हिरो मायकेल ब्रेसवेल केवळ २२ धावा करू शकला. कारण या सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी उत्कृष्ट होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 5/9

    मोहम्मद शमीने ३ तर हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने २-२ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी १-१ विकेट घेतली. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 6/9

    भारताला न्यूझीलंडला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकल्यास ११३ गुणांसह वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 7/9

    न्यूझीलंडविरुद्धच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसणार आहे.वनडे मालिकेत भारताच्या ३-० ने विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वनडे क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरेल. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 8/9

    पहिले दोन सामने जिंकून भारताचे ११२ गुण झाले आहेत तर ऑस्ट्रेलियाचे ११२ गुण आहेत.जेव्हा न्यूझीलंड संघाने वनडे मालिका खेळायला सुरू केली, तेव्हा ते पहिल्या स्थानावर होते. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 9/9

    परंतु सलग दुसऱ्या पराभवानंतर ते ११७ वरून ११५ गुणांवर आले आहेत. तिसरा पराभव झाल्यास त्याचे ११३ गुण होतील आणि इंग्लंड पहिल्या तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. (फोटो-सौजन्य ट्विटर)

TOPICS
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमAustralia Cricket Teamक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaभारत विरुद्ध न्यूझीलंडIndia vs New Zealand

Web Title: Ind vs nz odi series big shock to australia due to indias series win team india will benefit in ranking vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.