• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. opener prithvi shaw who scored a triple century will be included in the playing xi of team india against nz 2nd t20 vbm

IND vs NZ 2nd T20: त्रिशतक झळकावणाऱ्या सलामीवीराची टीम इंडियात होणार एंट्री; दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या अडचणी वाढणार

Prithvi Shaw: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात खराब सलामीचा फटका भारतीय संघाला सहन करावा लागला. ज्यामध्ये घडवणारा शुभमन गिल आणि इशान किशन अपयशी ठरले. त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये पृथ्वी शॉला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Updated: January 28, 2023 19:26 IST
Follow Us
  • IND vs NZ 2nd T20 Match Prithvi Shaw in the playing XI of Team India
    1/9

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील महत्त्वाचा सामना रविवारी होणार आहे. पहिला सामना जिंकून पाहुण्या संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 2/9

    त्यामुळे मालिकेत स्थान टिकण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतात. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 3/9

    एकदिवसीय क्रिकेटमध्ये थैमान घालणाऱ्या शुबमन गिलने आतापर्यंत टी-२०मध्ये निराशा केली आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये त्याच्या जागी युवा पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 4/9

    देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर निवडकर्त्यांनी पृथ्वीला संघात स्थान दिले आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 5/9

    पृथ्वी शॉने टीम इंडियात शतकासह पदार्पण केले होते, मात्र त्यानंतर दुखापती आणि खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळावे लागले. आता तो टी-२० संघात परतला असून त्याला दुसऱ्या सामन्यात खेळायला मिळेल अशी अपेक्षा आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 6/9

    टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. या फलंदाजाने तिन्ही फॉरमॅटमध्ये मोठ्या खेळी खेळल्या आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 7/9

    सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टी-२० फॉर्मेटमध्ये शतक, विजय हजारे ट्रॉफीच्या वनडेमध्ये द्विशतक आणि कसोटीच्या रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक झळकावले आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 8/9

    अलीकडेच जेव्हा पृथ्वीने आसामविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात ३७९ धावांची खेळी केली. तेव्हा निवडकर्त्यांनी त्याला टीम इंडियात स्थान देण्यास भाग पाडले. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 9/9

    पृथ्वीची ही खेळी रणजी इतिहासातील दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली. या वैयक्तिक कामगिरीबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही त्यांचे अभिनंदन केले. (फोटो-सौजन्य ट्विटर)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaपृथ्वी शॉPrithvi Shawभारत विरुद्ध न्यूझीलंडIndia vs New Zealand

Web Title: Opener prithvi shaw who scored a triple century will be included in the playing xi of team india against nz 2nd t20 vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.