• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. vinesh phogat sakshi malik bajrang punia sangeeta phogat vs police march to parliament in delhi ssa

PHOTOS: तिरंग्याची शान वाढवणाऱ्या कुस्तीपटूंना फरफटत नेलं; देशभरातून संतप्त प्रतिक्रिया

गेल्या दीड महिन्यांपासून कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत.

Updated: May 28, 2023 19:25 IST
Follow Us
  • नव्या संसदेच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ( २८ मे ) उद्घाटन केलं. दुसरीकडं जंतर-मंतर मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे.
    1/9

    नव्या संसदेच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ( २८ मे ) उद्घाटन केलं. दुसरीकडं जंतर-मंतर मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे.

  • 2/9

    भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचं आरोप केला आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे.

  • 3/9

    पण, अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत.

  • 4/9

    नव्या संसदेचं उद्घाटन होत असताना आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगत या खेळाडूंकडून जंतर-मंतरवरून कूच करत आज संसदेसमोर ‘महापंचायत’ भरवण्यात येणार होती.

  • 5/9

    मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी बळाचा वापर करत अनेक खेळाडूंना ताब्यात घेतलं आहे.

  • 6/9

    जंतर-मंतर मैदानातून संसदेच्या दिशेने कूच करण्याच्या प्रयत्नात असलेले कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना पोलिसांनी फरफरट नेत जबरदस्ती आपल्या वाहनात बसवलं.

  • 7/9

    एकीकडे खेळाडूंवर अटकेची कारवाई होत असताना दुसरीकडे आंदोलनास्थळावरील खेळाडूंच्या गाद्या, पंखे आणि इतर साहित्यही पोलिसांनी हटवलं.

  • 8/9

    त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसता येऊ नये, अशी व्यवस्था तर पोलिसांकडून करण्यात आल्याचं दिसत आहे.

  • 9/9

    साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळातून अभिमानस्पद कामगिरी केली आहे. त्याच खेळाडूंवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

TOPICS
कुस्तीWrestlingपोलीसPolice

Web Title: Vinesh phogat sakshi malik bajrang punia sangeeta phogat vs police march to parliament in delhi ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.