-
ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
-
तमाम भारतीयांच्या आशा पूर्ण करत भालाफेकपटू नीरज चोप्रानं रविवारी मध्यरात्री देशाला जागतिक अॅखलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिलं.
-
या विजयासह नीरज चोप्रानं इतिहास घडवला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
-
गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र जगभरातल्या महत्त्वाच्या स्पर्धांची विजेतेपदं घेऊन बुडापेस्टला दाखल झालेल्या नीरजनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला.
-
आत्तापर्यंत नीरजनं १० वेळा ८८ मीटरहून जास्त टप्प्यावर भालाफेक केली आहे. ८५ मीटरहून जास्त टप्प्यावर २६ वेळा तर ८२ मीटरहून जास्त टप्प्यावर ३७ वेळा भालाफेक केली आहे.
-
यंदाच्या हंगामानंतर झालेल्या स्पर्धांमध्ये ८९.९४ मीटर ही नीरजची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तर सर्वात कमी लांबीचा त्याचा टप्पाही ८८.१३ मीटर आहे!
-
प्रत्येक स्पर्धेत उत्तमोत्तम कामगिरी करत नीरजने आपल्या देशाचं नाव मोठं केलं आहे. नीरजच्या या यशामागे त्याचा आहार, कठोर मेहनत आणि व्यायाम यांचा मोठा वाटा आहे.
-
नीरज आपल्या दिवसाची सुरुवात नारळपाणी किंवा फळांचा रस पिऊन करतो. सकाळच्या नाश्त्याला तो फळे, मायक्रोन्यूट्रिएन्ट्स आणि प्रोटीनचे सेवन करणे पसंत करतो.
-
आपल्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यानंतर नीरजने मांसाहार करण्यास सुरुवात केली होती. तो दिवसाला चार ते पाच हजार कॅलरीचे सेवन करतो.
-
प्रोटीनसाठी नीरज अंडी, मासे, चिकन खात असला तरीही सुरुवातीपासून शाकाहारी असल्याने टोफू किंवा पनीर खाणे त्याला जास्त आवडते.
-
एका दिवसात तो एक ते दोन चमचे व्हे प्रोटीन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि फिश ऑइल सपलीमेन्ट घेतो.
-
नीरज दिवसाचे सहा ते सात तास व्यायाम करतो. तसेच ताकद वाढवण्यासाठी तो स्टेडियम आणि जीममध्ये ट्रेनिंग घेतो. (सर्व फोटो : नीरज चोप्रा/ इन्स्टाग्राम)
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचं ‘फिटनेस सिक्रेट’ काय? स्ट्रीक्ट डाएट प्लॅनची जगभरात चर्चा
नीरजच्या या यशामागे त्याचा आहार, कठोर मेहनत आणि व्यायाम यांचा मोठा वाटा आहे.
Web Title: What is the fitness secret of india golden boy neeraj chopra javelin champion strict diet plan is in discussion worldwide pvp