-
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सीजनसाठी सर्व संघांनी आपल्या जर्सीलूकची घोषणा केली आहे. सोबतच आरसीबी संघाने आपल्या अनबॉक्सिंग इव्हेंटमध्ये त्यांचे संघाबद्दल एक नवीन खुलासा देखील केला आहे. (फोटो : आरसीबी/इन्स्टाग्राम)
-
19 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ने त्यांच्या संघाला एक नवीन ओळख दिली आहे. या फ्रँचायझीने संघाचे नाव बंगलोर वरून बेंगळुरू असे बदलले आहे. सोबतच त्यांनी आयपीएल 2024 साठी त्यांची नवीन जर्सी देखील सादर केली. या नवीन जर्सीमध्ये लाल आणि निळ्या रंगाचे समावेश करण्यात आले आहे. (फोटो : आरसीबी/इन्स्टाग्राम)
-
आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडियाद्वारे आपली जर्सी लॉंच केली आहे. नवीन जर्सी व्हिडिओ पोस्ट करून व्हिडिओमध्ये कर्णधार हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा आहेत जर्सी नेहमी प्रमाणे ब्लू आणि गोल्ड रंगाची आहे. मुंबई इंडियन्सने जर्सीची रंग योजन मागील वर्षीप्रमाणेच ठेवली आहे. (फोटो : मुंबई इंडियन्स/इन्स्टाग्राम)
-
चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रँचायझीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नवीन जर्सीचे फोटो अपलोड केले आहेत आणि चाहते यंदाच्या सीजनसाथी या पिवळ्या जर्सी खरेदी करू शकतात.
(फोटो : चेन्नई सुपर किंग्ज अधिकृत वेबसाइट) -
पंजाब किंग्सने त्यांच्या जर्सी लॉंच इव्हेंटमध्ये प्रीती झिंटा आणि कर्णधार शिखर धवन सोबत त्यांची नवीन जर्सी लाँच केली. या सीजनसाठीही संघाने गडद लाल रंग निवडला आहे. परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदा सोनेरी रंगाऐवजी त्यांनी निळ्या रंग घेतला आहे.
(फोटो : पंजाब किंग्स/इन्स्टाग्राम) -
या सीझनसाठी आपली नवीन जर्सी लॉन्च करणारा सनरायझर्स हैदराबाद हा पहिला संघ होता. यावेळी आपल्या जर्सीच्या डिझाईनवर संघाने बरेच बदल केले आहेत.
(फोटो : सनरायझर्स हैदराबाद /इन्स्टाग्राम) -
गुजरातने देखील त्यांच्या नवीन जर्सीचे व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आणि हे चाहत्यांना विक्रीसाठीही उपलब्ध केले आहे.
(फोटो : गुजरात टायटन्स /इन्स्टाग्राम) -
राजस्थान रॉयल्स संघाने या वेळी नेहमी प्रमाणेच गुलाबी आणि निळ्या रंग निवडला आहे. पण 6 एप्रिल रोजी आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्स संघ संपूर्ण गुलाबी जर्सीमध्ये दिसणार आहे. ही विशेष जर्सी सर्व भारतीय महिलांचा आदर म्हणून घातली जाणार आहे.
(फोटो : राजस्थान रॉयल्स /इन्स्टाग्राम) -
केकेआर ने देखील आपल्या सोशल मीडियाद्वारे जर्सी लंच केली या नवीन जर्सीमध्ये सोनिरी आणि जांभळा रंग आहे.
(फोटो : केकेआर /इन्स्टाग्राम) -
दिल्ली कॅपिटल्सने यावर्षीच्या आयपीएलसाठी जर्सीच्या डिझाईनमध्ये थोडे बदल करून निळा आणि लाल रंगाची जर्सी निवडली आहे.
(फोटो : दिल्ली कॅपिटल्स /इन्स्टाग्राम)
IPL 2024: आयपीएलसाठी सर्वच संघांच्या जर्सीमध्ये झाले बदल, पाहा मुंबई इंडियन्स ते दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीचे नवीन लूक
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सीजनसाठी सर्व संघांनी आपल्या जर्सीलूकची घोषणा केली आहे. सोबतच आरसीबी संघाने आपल्या अनबॉक्सिंग इव्हेंटमध्ये त्यांचे संघाबद्दल एक नवीन खुलासा देखील केला आहे.
Web Title: Ipl 2024 all teams get jersey changes for ipl check the new look mumbai indians to delhi capitals jerseys arg 02