• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 ruturaj gaikwad now as chennai captain lets see how was his journey from a player to captain arg

IPL 2024: ऋतुराज गायकवाडकडे आता चेन्नईच्या कर्णधारपदाचे आव्हान, खेळाडू ते कॅप्टनपर्यंतचा कसा होता प्रवास

इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये होणार आहे. आयपीएलबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. यंदा एक मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे या वर्षी चेन्नईचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीऐवजी रुतुराज गायकवाडच्या हाती दिले गेले आहे. कर्णधारपदाची कमान ऋतुराज कसा सांभाळतो हे पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकतेच असणार आहे. जाणून घेऊया…

March 22, 2024 18:19 IST
Follow Us
  • IPL-2024-CSK-captian-ruturaj-gaikwad
    1/12

    इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये होणार आहे. आयपीएलबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. यंदा एक मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे या वर्षी चेन्नईचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीऐवजी रुतुराज गायकवाडच्या हाती दिले गेले आहे.

  • 2/12

    कर्णधारपदाची कमान ऋतुराज कसा सांभाळतो हे पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकतेच असणार आहे. जाणून घेऊया कसा होता ऋतुराजचा आतापर्यंतचा आयपीएल प्रवासा.

  • 3/12

    ऋतुराज गायकवाडचा जन्म 31 जानेवारी 1997 रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. ऋतुराज हा एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. रुतुराज गायकवाडने भारतासाठी सहा एकदिवसीय आणि 19 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्स द्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी एकूण 52 सामने खेळले आहेत.

  • 4/12

    ऋतुराज गायकवाडच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झालं तर २०१९ मध्ये आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने ऋतुराजला २० लाख रुपयांच्च्या किमतीत विकत घेतले होते पण २०१९ ला त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही त्याला त्या सीजनमध्ये बेंचवरच राहावं लागलं होतं.

  • 5/12

    २०२० मध्ये ऋतुराजला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्यांदा खेळण्याची संधि मिळाली आणि इथून त्याने आपले आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र या पहिल्या संधीत तो शून्यावर बाद झाला. पुढे त्या सीजनला ऋतुराजने एकूण सहा सामने खेळले आणि चार डावात त्याने तीन अर्धशतक झळकावून एकूण 204 धावा केल्या होत्या.

  • 6/12

    पुढे आयपीएलच्या २०२१ सीजनमध्ये या खेळाडूला फाफ डू प्लेसिससोबत चेन्नईसाठी सलामीची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत ऋतुराज हा २०२१ आयपीएलचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

  • 7/12

    ऋतुराजने २०२१ सीजनमध्ये एकूण 16 डावांमध्ये १३६. २६ च्या स्ट्राइक रेटने ६३५ धावा केल्या आणि चार अर्धशतकांसह त्याने एक शतक झळकावले होते.

  • 8/12

    २०२१ च्या सीजनला ऋतुराजने ऑरेंज कॅप देखील जिंकली आणि त्यासोबत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणार तो आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

  • 9/12

    आयपीएल २०२१ मधील त्याची दमदार कामगिरी पाहून ऋतुराजला आयपीएल २०२२ च्या लिलावापूर्वीच ६ कोटी रुपयांमध्ये चेन्नईने कायम ठेवलं होतं. आयपीएल २०२३ मध्ये ही पुन्हा चेन्नईने ऋतुराजला कायम ठेवलं होत.

  • 10/12

    २०२३च्या आयपीएल सीजन मध्ये ऋतुराजने १६ सामन्यांमध्ये ४२.१४ च्या सरासरीसह १४७.५० च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने एकूण 590 धावा केल्या.

  • 11/12

    ऋतुराजच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी २०२४ च्या सीजनसाठी चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनीच्या जागी ऋतुराजला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो : ऋतुराज गायकवाड / इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl 2024 ruturaj gaikwad now as chennai captain lets see how was his journey from a player to captain arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.