• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. winning formula for ipl 2024 hit sixes and reach the finals know csk mi rcb stats pvp

IPL 2024 जिंकण्याचा फंडा! षटकार चोपा आणि फायनल गाठा; CSK, MI, RCBची आकडेवारी जाणून घ्या

प्रत्येक आयपीएल हंगामात कोणत्या संघांनी सर्वाधिक षटकार मारले आहेत आणि त्यापैकी किती संघ अंतिम फेरीत गेले, हे जाणून घेऊया.

Updated: March 29, 2024 19:48 IST
Follow Us
  • Winning-Formula-for-IPL-2024
    1/21

    प्रत्येक खेळाचे काही डावपेच, काही युक्त्या असतात. त्यानुसारच खेळात यश मिळणे निश्चित असते. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 2/21

    आयपीएलही अशाच प्रकारच्या रणनीती आणि डावपेचांनी भरलेला एक खेळ आहे. आज आपण आयपीएल जिंकण्यासाठीचे काही सूत्र जाणून घेऊया. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 3/21

    आयपीएल हा टी२०चा प्रकार असून टी२०मध्ये षटकार मारणे अतिशय महत्त्वाचे असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर असोत किंवा फ्रँचायझी क्रिकेटमध्ये, मोठे सिक्स-हिटर्स नसलेले संघ अशा स्पर्धांमध्ये संघर्ष करतात. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 4/21

    २००८ वगळता मागील हंगामांमध्ये ज्या संघाचे अधिक षटकार आहेत, तेच संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत, असे दिसून आले आहे. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 5/21

    याच आकडेवारीमुळे आंद्रे रसेल, ग्लेन मॅक्सवेल, रिंकू सिंग, एमएस धोनी, शिवम दुबे, हार्दिक पांड्या हे खेळाडू त्यांच्या संघांच्या यशासाठी महत्त्वाचे ठरतात. (फोटो : mumbaiindians/इन्स्टाग्राम)

  • 6/21

    यापैकी काही खेळाडूंना त्यांच्या फिटनेससंबंधी समस्यांमुळे काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरीही फ्रँचायझींनी कधीही त्यांच्याकडे पाठ फिरवली नाही. (फोटो : mumbaiindians/इन्स्टाग्राम)

  • 7/21

    कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करण्याची क्षमता असल्यामुळे हे खेळाडू त्यांच्या खेळाच्या दिवशी मॅच विनिंग कामगिरी करून दाखवण्यात यशस्वी ठरतात. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 8/21

    मागील काही स्पर्धांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की दमदार पॉवर गेममुळे वेस्ट इंडिजला दोन टी-20 विश्वचषक जिंकण्यात मदत झाली. (फोटो : Reuters)

  • 9/21

    २०१६ मध्ये टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला होता. त्यांच्या पॉवर गेममुळे वेस्ट इंडिजने तो सामना जिंकला. खरेतर, विंडीजने हे विश्वचषक त्यांच्या षटकार ठोकण्याच्या क्षमतेमुळे जिंकले. (फोटो : Reuters)

  • 10/21

    या उपांत्य फेरीत विंडीजने एकूण ११ षटकार ठोकले तर भारताने केवळ तीन. सुरेश रैना, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांसारखे उत्कृष्ट षटकार मारणारे फलंदाज असतानाही भारत आठ विकेट्ससह परतला. (फोटो : PTI)

  • 11/21

    त्या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी मिळालेल्या रिप्रीव्हचा पुरेपूर वापर केला. त्यांनी १९.४ शतकांमध्येच त्यांचा खेळ पूर्ण केला. यावेळी त्यांनी मारलेल्या ११ षटकारांची त्यांना खूप मदत झाली. इतकंच नाही तर त्यांनी भारताच्या तुलनेत अधिक चौकारही मारले होते. (फोटो : AP)

  • 12/21

    थोडक्यात, वेस्ट इंडिजने १९६ पैकी ११४ धावा षटकार आणि चौकारमधून मिळवल्या, याउलट भारताने फक्त 92 धावा केल्या. हा फरक खूप काही सांगणारा आहे. (फोटो : AP/Reuters)

  • 13/21

    २०१५ च्या विश्वचषक पराभवानंतर इंग्लंडने एकदिवसीय सामन्यांमध्ये हेच सिक्स मारण्याचे तत्त्व स्वीकारले. हे कठीण होते पण त्यांनी आपला खेळ बदलला नाही आणि अखेरीस त्यांनी त्यांचे पहिले पन्नास षटकांचे विश्वचषक जिंकले. चौकार आणि षटकाराच्या संख्येवर त्यांनी अंतिम सामना जिंकला हे सामन्यातील चौकार आणि षटकाराचे महत्त्व सांगण्यासाठी पुरेसे आहे. (फोटो : Reuters)

  • 14/21

    प्रत्येक आयपीएल हंगामात कोणत्या संघांनी सर्वाधिक षटकार मारले आहेत आणि त्यापैकी किती संघ अंतिम फेरीत गेले, हे जाणून घेऊया. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 15/21

    आयपीएलच्या पहिल्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबने सर्वाधिक ९५ षटकार मारले होते. दुसरा सर्वाधिक सिक्स मारणारा संघ डेक्कन चार्जर्सचा होता. दोघांनाही अंतिम फेरी गाठता आली नाही. तथापि, २००९ पासून, आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या किमान एका संघाने अंतिम फेरी गाठली आहे. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 16/21

    २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सने ९९ षटकार मारत जेतेपदावर आपले नाव कोरले. २०१० मध्ये सीएसकेने सर्वाधिक ९७ षटकार मारून स्पर्धा जिंकली होती. तर २०११ मध्ये, सीएसकेने या सीझनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक ९१ षटकार मारत ट्रॉफी जिंकली. यावेळी ९४ षटकार मारणारा आरसीबी संघही अंतिम फेरीत होता. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 17/21

    २०१२ मध्ये सीएसकेने ११२ षटकारांसह पुन्हा फायनलमध्ये प्रवेश केला. मुंबई इंडियन्सने २०१३ मध्ये सर्वाधिक षटकार मारले आणि स्पर्धा जिंकली. पंजाब किंग्जने २०१४ मध्ये १२७ षटकारांच्या जोरावर पहिली फायनल गाठली होती. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 18/21

    २०१५ मध्ये देखील, मुंबईने सर्वाधिक १२० षटकार मारले आणि दुसऱ्यांदा चॅम्पियनशिप जिंकली. पुढील वर्षी आरसीबीने १४२ षटकारांसह अंतिम फेरी गाठली. २०१७ मध्ये, मुंबईने तिसऱ्यांदा ११७ षटकारांसह स्पर्धा जिंकली. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 19/21

    सीएसकेने २०१८ साली १४५, २०२१ साली ११५ आणि २०२३ साली ११३, तर मुंबईने २०१९ साली ११५ आणि २०२० साली १३७ सर्वाधिक षटकार मारून स्पर्धा जिंकली. त्याचबरोबर २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सने १३७ षटकारांच्या जोरावर अंतिम फेरी गाठली. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 20/21

    हा ट्रेंड पाहता, या लीगमध्ये जे संघ सातत्याने षटकार ठोकू शकतात त्यांची अंतिम फेरीसाठी पात्र होण्याची शक्यता वाढू शकते. (फोटो : iplt20/इन्स्टाग्राम)

  • 21/21

    हेही पाहा : IPL: ‘या’ साऊथ आफ्रिकन खेळाडूने मिळवला सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकण्याचा मान; पाहा संपूर्ण यादी

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Winning formula for ipl 2024 hit sixes and reach the finals know csk mi rcb stats pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.