-
गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या पंजाब किंग्जस विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यामध्ये पंजाबने ३ विकेट राखून गुजरातचा पराभव केला.
(फोटो : शशांक सिंग / इन्स्टाग्रामवर) -
या सामन्यामध्ये सर्वात चर्चेत असलेला खेळाडू म्हणजेच फलंदाज शशांक सिंग. शशांक आपल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे प्रेक्षकांकढून खूप कौतुक मिळवलं आहे.
(फोटो : शशांक सिंग / इन्स्टाग्रामवर) -
डिसेंबर २०२३ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावा दरम्यान पंजाब किंग्सला एका खेळाडूच्या नावावरून गोंधळ झाला आणि त्यांनी चुकीची निवड केली अशी चर्चा होती आणि नंतर लिलावकर्त्याने त्यांना खेळाडू बदलण्यापासूनही रोखले कारण तोवर खेळाडूची विक्री पूर्ण झाली होती.
(फोटो : शशांक सिंग / इन्स्टाग्रामवर) -
लिलावात पंजाब किंग्जच्या व्यवस्थापनाने छत्तीसगडसाठी खेळणाऱ्या ३२ वर्षीय शशांक सिंगला २० लाख रुपयांना विकत घेतले.
(फोटो : शशांक सिंग / इन्स्टाग्रामवर) -
मात्र, पंजाब किंग्जची लिलावादरम्यान झालेली चूक त्यांना फायदेशीर ठरली. गुरवारी झालेल्या सामन्यामध्ये शशांकने एक उत्कृष्ट खेळी करत २९ चेंडूत नाबाद ६१ धावा करून गुजरात संघाला मात दिली.
(फोटो : शशांक सिंग / इन्स्टाग्रामवर) -
सामन्यामध्ये शशांकने सहा चौकार आणि चार षटकार मारले आणि त्याला आशुतोष शर्माने १७ चेंडूत ३१ धावा करून एक चांगली साथ दिली कारण या दोघांनी केवळ २२ चेंडूत ४३ धावांची भागीदारी केली.
(फोटो : शशांक सिंग / इन्स्टाग्रामवर) -
सामन्यानंतर संघ मालक प्रीती झिंटाने शशांक सिंग बद्दल इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत त्याच कौतुक केलं आणि त्याच्या या उत्कृष्ट खेळीबद्दल त्याला शुभेच्छाही दिल्या.
(फोटो : शशांक सिंग / इन्स्टाग्रामवर) -
३२ वर्षीय फलंदाज शशांक देशांतर्गत क्रिकेटमध्ये छत्तीसगड संघामधून खेळतो. शशांकने आतापर्यंत ५५ टी-२० सामने खेळले असून १३५.८३ च्या स्ट्राइक रेटने ७२४ धावा केल्या आहेत आणि १५ विकेट्स देखील घेतल्या आहेत. यापूर्वी शशांक आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांचा भाग होता.
(फोटो : शशांक सिंग / इन्स्टाग्रामवर)
IPL 2024: लिलावातील चूक पंजाबसाठी ठरली वरदान? शशांक सिंगच्या जबरदस्त कामगिरीने केली गुजरातवर मात
डिसेंबर २०२३ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावा दरम्यान पंजाब किंग्सला एका खेळाडूच्या नावावरून गोंधळ झाला आणि त्यांनी चुकीची निवड केली अशी चर्चा होती आणि तो खेळाडू म्हणजे शशांक सिंग. जाणून घेऊया या खेळाडू बद्दल.
Web Title: A mistake in the auction was a boon for punjab shashank singh excellent performance defeated gujarat arg 02