-
मंगळवारी पार पडलेल्या केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यामध्ये जोस बटलरने एक शानदार नाबाद शतकाचे प्रदर्शन करून तो आता आयपीएल इतिहासातील सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानकावर कायम झाला आहे.
-
जोस बटलरच्या या दमदार शतकामुळे राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाइट रायडर्सला २ विकेट्सने पराभूत केले.
-
राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने या सामन्यामध्ये ६० चेंडूत १०७ धावा करत एक नाबाद शतक झळकावले.
-
या शानदार नाबाद शतकासह जोस बटलरने ख्रिस गेलचा विक्रम देखील मोडला. जोस बटलर आता सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या आधी या जागे ख्रिस गेल एकूण 6 शतकासह होता.
-
केकेआर विरुद्ध सामन्यानंतर आता जॉस बटलरचे आयपीएलमध्ये एकूण 7 शतके आहेत.
-
सामन्यामध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जोस बटलरने १७८.३३ च्या स्ट्राईक रेटने ६० चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकार मारले.
-
या यादीत आरसीबी स्टार बॅटर फलंदाज विराट कोहली अजूनही 8 शतकांनी पहिल्या स्थानावर आहे.
-
या शतकासह जोस बटलरने दुसऱ्या स्थानावर आपले नाव कायम करून तो आता ऑरेंज कॅपच्या यादीत 10 व्या क्रमांकावरही सामील झाला आहे. (सर्व फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)
IPL 2024: केकेआरविरुद्ध दमदार शतक झळकावत जोस बटलरने मोडला ख्रिस गेलचा विक्रम
मंगळवारी पार पडलेल्या केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यामध्ये जोस बटलरने एक शानदार नाबाद शतकाचे प्रदर्शन करून तो आता आयपीएल इतिहासातील सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानकावर कायम झाला आहे.
Web Title: Ipl 2024 jos buttler breaks chris gayles record with his powerful century against kkr in ipl arg 02