-
रोहित शर्मा
भारताचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू असलेला सर्वांचा लाडका रोहित शर्मा आज आपला ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. -
सामना
आज ३० एप्रिल रोजी रोहित शर्माचा वाढदिवस असून मुंबई इंडियन्सचा सामना देखील होणार आहे, त्यामुळे हा सामना जिंकत संघ रोहितला एक खास गिफ्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. -
स्पेशल
रोहित शर्माच्या वाढदिवसासाठी मुंबई इंडियन्सने काही स्पेशल पोस्ट केल्या आहेत. ज्यामध्ये मैदानात स्टंप माईकवर रोहितची गाजलेली वाक्यं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. -
भाग पुजी
२०१९ मधील दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित-पुजारा मैदानात फलंदाजी करत असतानाचा हा किस्सा आहे. यावेळेस एक धाव घेण्यासाठी रोहितने पुजाराला ‘पुजी भाग’ असं म्हटलं होतं. -
अरे वीरू
२०२४ मध्ये झालेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये अंपायरने रोहितला थाय पॅड दिले होते, यावर रोहितने त्याला विचारले होते, “अऱे वीरू थाय पॅड दिला का,अरे ऐवढी मोठी बॅट होती, आधीच दोन वेळा शून्यावर आऊट झालोय.” त्यापूर्वी रोहित पहिल्या दोन्ही टी-२०मध्ये शून्यावर बाद झाला होता. -
जाऊदे घेऊन टाकतो
२०२३-२४च्या दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचे तिन्ही रिव्ह्यू बाकी होते आणि संघ चांगल्या स्थितीत होता. तेव्हा सिराजच्या एका गोलंदाजीवर आऊटचं अपील करण्यात आलं तेव्हा रोहित म्हणाला होता, “जाऊदे घेऊन टाकतो ३-३ रिव्ह्यू बाकी आहेत.” -
गार्डनमध्ये फिरणारी मुलं
आयपीएलपूर्वी घरच्या मैदानावर इंग्लंडविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ युवा खेळाडूंसह उतरला होता. यावेळेस मुलांनी नीट फिल़्डींग करावी म्हणून रोहित त्यांना ओरडला होता की, “मैदानात कोणी फिरताना दिसलात तर तुमची खैर नाही.” हे रोहितचं वाक्यं फारचं गाजलं. (सर्व फोटो सौजन्य – मुंबई इंडियन्स)
Rohit Sharma Birthday: रोहित शर्मा स्पेशल स्टंप माईकवर गाजलेली वाक्यं, “भाग पुजी” पासून ते “गार्डनमध्ये फिरणारी मुले”
Rohit Sharma Birthday Special: भारताचा कर्णधार रोहित शर्मा आज ३० एप्रिल रोजी आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसानिमित्त स्टंप माईकवर रेकॉर्ड झालेली खास वाक्य पाहूया.
Web Title: Rohit sharma birthday special stump mic recoreded iconic slogans from pujji bhaag to koi garden mein nhi ghumega bdg