• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ritika sajdeh celebrates her favourite boy rohit sharmas 37th birthday with sweet post and shared unseen picture vbm

PHOTOS : ‘लव्ह यू रो’, पत्नी रितिकाने रोहितला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पोस्ट शेअर करुन केला प्रेमाचा वर्षाव

Rohit Sharma’s 37th Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. पत्नी रितिका सजदेहने रोहित शर्माला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर काही फोटो शेअर करताना तिने रोहितसाठी काही ओळीही लिहिल्या आहेत.

April 30, 2024 22:33 IST
Follow Us
  • Rohit Sharma's 37th Birthday
    1/9

    भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आज ३७ वर्षांचा झाला आहे. रोहितने आपल्या खास लोकांसोबत केक कापून हा सोहळा साजरा केला.

  • 2/9

    रोहित शर्माचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोत तो केक कापताना दिसत आहे, पत्नी रितिकाही त्याच्याजवळ उभी आहे.

  • 3/9

    त्याचबरोबर सूर्यकुमार यादवही त्याच्या पत्नीसोबत उभा आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये रोहित शर्मा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये पत्नीला मिठी मारताना दिसत आहे.

  • 4/9

    रितिका सजदेहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रोहितला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रोहितसोबतचे स्वतःचे आणि मुलगी समायरासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    फोटो शेअर करताना रितिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि आश्चर्यांनी भरले जावो, स्वप्ने सत्यात उतरू दे आणि भरपूर प्रेम.

  • 6/9

    यानंतर रितिकाने शेवटच्या वाक्यात ‘लव यू रो’ असे लिहले आहे. रोहित शर्माला पत्नी रितिका सजदेहचा नेहमीच पूर्ण पाठिंबा मिळतो.

  • 7/9

    रितिका मॅचदरम्यान त्याला चिअर करण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्येही येते. नुकत्याच झालेल्या आयपीएल मॅचेसमध्येही रितिका स्टँडवर बसलेली दिसली होती.

  • 8/9

    यापूर्वी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या जवळपास प्रत्येक सामन्यात रोहितला सपोर्ट करण्यासाठी रितिका स्टेडियममध्ये पोहोचली होती. फायनलमधील पराभवाच्या वेळीही रितिका स्टँडवर उपस्थित होती आणि निराश दिसत होती.

  • 9/9

    आयपीएल २०२४चा ४८ वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला वाढदिवसाच्या निमित्ताने मोठी खेळी साकारुन हा दिवस आणखी संस्मरणीय बनवू शकतो.

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025रितिका सजदेहRitika Sajdehरोहित शर्माRohit SharmaवाढदिवसBirthday

Web Title: Ritika sajdeh celebrates her favourite boy rohit sharmas 37th birthday with sweet post and shared unseen picture vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.