-
टी२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सोमवारी सुपर८ लढतीत भारताविरुद्ध पराभव झाला. (ICC)
-
अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषक २०२४च्या सेमीफायनलमध्ये धडक मारत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले आहे. (ICC)
-
सध्या संपूर्ण जगभरात टी20 वर्ल्डकपचा उत्साह पाहायला मिळतोय. असंख्य क्रिकेटप्रेमी त्यांच्या आवडत्या संघांना पाठिंबा देत आहेत. (ICC)
-
याच पार्श्वभूमीवर आज आपण अशा क्रिकेटपटूंबाबत जाणून घेऊया ज्यांनी भारतीय मुलीशी लग्न केले आहे. यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीपासून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे. (ICC)
-
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने एका भारतीय महिलेशी लग्न केले असून तिचे नाव शामिया आरज़ू असे आहे. ती एक इंजिनियर असून ती मुळची हरियाणाची आहे. (Instagram)
-
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने माशूम सिंघा या भारतीय महिलेशी लग्न केले आहे. माशूम ही पेशाने रॅम्प मॉडेल असून त्यांची पहिली भेट आयपीएल दरम्यान झाली. त्यांनी 12 जून 2014 ला लग्न केले. (ICC)
-
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहसिन खानने बॉलीवूड अभिनेत्री रीना रॉयशी लग्न केले. इतकंच नाही तर लग्नानंतर मोहसिन भारतात येऊन बॉलीवूडमध्ये कामही केले. तथापी नंतर दोघेही वेगळे झाले.
-
२०१० मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचं लग्न झालं. या दोघांचा प्रेमविवाह होता. काही महिन्यांपूर्वीचं त्यांनी घटस्फोट घेतला असून शोएबने तिसरे लग्न केले आहे. (Instagram)
-
श्रीलंकेचा माजी दिग्गज स्पिनर मुथय्या मुरलीधरनने मुळची चेन्नईची असलेल्या मधिमलार राममूर्ती आहे. त्यांनी 21 मार्च 2005 साली लग्न केले. (Instagram)
-
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने विनी रमणशी लग्न केले. ती आधीपासूनच ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक होती. 2017 साली त्यांनी डेट करायला सुरुवात केली आणि 2022 साली त्यांनी लग्न केले. (Instagram)
T20 WC 2024: ‘या’ परदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी केला प्रेमविवाह; यादीत अनेक पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश
सध्या संपूर्ण जगभरात टी20 वर्ल्डकपचा उत्साह पाहायला मिळतोय. असंख्य क्रिकेटप्रेमी त्यांच्या आवडत्या संघांना पाठिंबा देत आहेत.
Web Title: T20 wc 2024 these foreign cricketers marry indian women the list includes many pakistani players pvp