• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. world champion indian cricket team back in india today after 4 days spl

PHOTOS : विश्वविजयानंतर मायदेशी परतले इंडियन क्रिकेटचे अजिंक्य तारे; भारतीय संघाचे जल्लोषात स्वागत!

भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मायदेशात दाखल झाला आहे. भारतीय संघ दिल्लीत पोहचताच चाहत्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.

Updated: July 4, 2024 12:38 IST
Follow Us
  • team india back in india photos
    1/24

    भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. (Photo- ICC)

  • 2/24

    २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. (Photo- ICC)

  • 3/24

    या विजयानंतर भारतीय संघ आज (४ जुलै) भारतात परतला आहे. ((Photo- BCCI)

  • 4/24

    भारतीय संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. (Photo- ICC)

  • 5/24

    दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून स्वागतासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. (Photo- BCCI)

  • 6/24

    भारतीय संघ सध्या दिल्लीत पोहोचला आहे. (Photo- BCCI)

  • 7/24

    विमानतळावर चाहत्यांनी प्रेमाने बनवलेला केक कर्णधार रहित शर्माने कापला तो क्षण. (Photo- ANI)

  • 8/24

    प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही हा केक कापला. (Photo- ANI)

  • 9/24

    हार्दिक पंड्यानेही याठिकाणी केक कापला. (Photo- ANI)

  • 10/24

    विराट कोहलीनेही चाहत्यांचे मन राखत केक कापला. (Photo- ANI)

  • 11/24

    पण यापैकी कोणीही माध्यमांशी संवाद साधला नाही. (Photo- ANI)

  • 12/24

    विमानतळाबाहेर कर्णधार रोहित शर्मा ढोल ताशांच्या तालावर चाहत्यांसह नाचताना दिसला. (Photo- BCCI)

  • 13/24

    बसमधून बाहेरील चाहत्यांना रोहितने ट्रॉफी दाखवली. (Photo- BCCI)

  • 14/24

    बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघाचे मायदेशी स्वागत केले. (Photo- BCCI)

  • 15/24

    छायाचित्रात रोहित आणि त्याचे कुटुंब दिसत आहे. (Photo- BCCI)

  • 16/24

    चाहत्यांनी रोहित आणि संघाचे स्वागत करताना फोटो काढले. चाहत्यांनी भारतीय संघाचा गणवेश परिधान केला होता. (Photo- BCCI)

  • 17/24

    रोहित शर्मा व जय शाह. (Photo- BCCI)

  • 18/24

    या बसमधून भारतीय संघ विमानतळावरून बाहेर पडला. (Photo- ANI)

  • 19/24

    थोड्याच वेळात भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाबरोबर संवाद साधण्याची शक्यता आहे. (Photo- ANI)

  • 20/24

     यानंतर संपूर्ण भारतीय संघ मुंबईकडे रवाना होणार आहे. (Photo- ICC)

  • 21/24

    भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ५ वाजता भारतीय संघाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. (Photo- ICC)

  • 22/24

    यासाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे. (Photo- ICC)

  • 23/24

    भारतीय संघ बुधवारी ग्रँटली अॅडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विशेष विमानाच्या साहाय्याने दिल्लीला दाखल झाला. (Photo- ICC)

  • 24/24

    यावेळी विमानतळावर चाहत्यांकडून स्वागतासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी होती. दिल्ली विमानतळावरून भारतीय संघ आयटीशी मौर्या हॉटेलमध्ये दाखल झाला. दरम्यान, भारतीय संघ दिल्लीत पोहचताच चाहत्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. (Photo- ICC)

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: World champion indian cricket team back in india today after 4 days spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.