• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. paris olympics 2024 educational qualifications of indian badminton player lakshya sen spl

आजोबा, वडील आणि भाऊ होते बॅडमिंटनपटू, २२ व्या वर्षी लक्ष्य सेन करोडपती, जाणून घ्या शैक्षणिक माहिती

Lakshya Sen Educational Qualification: भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. उत्तराखंडमधील अल्मोडा येथे जन्मलेल्या लक्ष्यला बॅडमिंटनचा वारसा मिळाला. त्याचे आजोबा, वडील आणि भाऊ हे सर्व बॅडमिंटनपटू आहेत.

Updated: August 6, 2024 15:37 IST
Follow Us
  • Lakshya Sen
    1/9

    भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. तो जिंकला असता तर या ऑलिम्पिकमधील देशाचे हे चौथे पदक ठरले असते. (Reuters Photo)

  • 2/9

    उत्तराखंडमधील अल्मोडा येथे जन्मलेल्या लक्ष्य सेनला बॅडमिंटनचा वारसा मिळाला आहे. त्याचे आजोबा सीएल सेन यांना अल्मोडा येथील बॅडमिंटनचे भीष्म पितामह म्हणतात. (Reuters Photo)

  • 3/9

    लक्ष्यचे वडील आणि भाऊ देखील बॅडमिंटनपटू आहेत. त्याचे वडील डीके सेन हे राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळले आहेत आणि ते राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक देखील आहेत. (Reuters Photo)

  • 4/9

    त्याचा भाऊ चिराग सेन याने आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, लक्ष्यनेही वयाच्या ९ व्या वर्षी दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. (Reuters Photo)

  • 5/9

    अल्मोडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लक्ष्य सेनच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलताना, त्याच्या बॅडमिंटन कारकिर्दीसह, त्याने उत्तराखंडच्या हल्दवानी येथील बीरशेबा वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, नेमकं शिक्षण किती आहे?, याची माहिती उपलब्ध नाही. (PTI Photo)

  • 6/9

    दरम्यान, वयाच्या १५ व्या वर्षी, लक्ष्यने राष्ट्रीय पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात तरुण भारतीय बनून त्याच्या मार्गदर्शकाचा विक्रम मोडला होता. २०१६ पर्यंत, लक्ष्यने अनेक ज्युनियर चॅम्पियनशिप देखील जिंकल्या. (PTI Photo)

  • 7/9

    राष्ट्रकुल क्रीडा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके मिळविणाऱ्या लक्ष्य सेनने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा आणि थॉमस चषक स्पर्धेतही भारताचा झेंडा फडकवला आहे. २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्स आणि थॉमस कपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. (PTI Photo)

  • 8/9

    लक्ष्य अनेक खेळाडूंना खेळासोबतच कमाईच्या बाबतीतही तगडी स्पर्धा देत आहे. वयाच्या २२ व्या वर्षी तो करोडपती झाला आहे. तो ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर कमाई करत आहे. त्यांची एकूण संपत्ती ४१ कोटी रुपये आहे. (PTI Photo)

  • 9/9

    हेही पाहा: स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स सारख्या दिग्गज अब्जाधीशांनी तरुण वयातच गाठली यशाची शिखरे; मार्क

TOPICS
ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024)Olympic 2024बॅडमिंटनBadmintonमराठी बातम्याMarathi News

Web Title: Paris olympics 2024 educational qualifications of indian badminton player lakshya sen spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.