-
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधील ५० किलो कुस्ती स्पर्धेत सहभागी झाली आहे.
-
ऑलिम्पिकमधील ५० किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला आणि या सामन्यात विनेश फोगटने ५-० असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.
-
विनेश फोगटच्या वैयक्तिक जीवनाबाबत बोलायचे झाले तर, विनेश फोगट आणि सोमवीर राठी यांच्या प्रेमकथेची सुरुवात कुस्तीच्या आवडीपासून झाली.
-
पुढे रेल्वेसाठी एकत्र काम करत असताना त्यांची मैत्री घट्ट झाली आणि २०१८ मध्ये विनेश आणि सोमवीर लग्नबंधनात अडकले.
-
विनेशच्या आयुष्यात सोमवीरची भूमिका पती असण्यापलीकडे एक कुस्ती सहायक म्हणूनही आहे. सोमवीरची कुस्तीबद्दल असलेली सखोल माहिती विनेशसाठी महत्त्वाची ठरली आहे.
मॅटवरील मैत्री बदलली प्रेमात अन्… जाणून घ्या कशी झाली ऑलिम्पिक खेळाडू विनेश फोगटची पतीसोबत भेट
जाणून घ्या कशी झाली ऑलिम्पिक खेळाडू विनेश फोगटच्या प्रेम कहाणीची सुरुवात.
Web Title: Friendship on the mat turned into love and know how olympian vinesh phogat met her husband somvir rathee arg 02