-
टोकियो सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकले.
-
भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्यपदक जिंकण्यात यश आले. भारतीय हॉकी संघाने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
-
स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत भारतासाठी कांस्यपदक जिंकले.
-
मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत कांस्यपदक जिंकले, मनूने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलं.
-
मनू भाकेरने मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजीतही कांस्यपदक जिंकले. यासह एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकेर पहिली भारतीय खेळाडू ठरली.
-
मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत मनू भाकेरसोबत सरबज्योत सिंगनेही कांस्यपदक जिंकले. (वरील सर्व फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा २१ वर्षीय अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात कुस्तीसाठी भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. यासह त्याने प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कुस्तीकडून भारताला मिळणाऱ्या पदकाची परंपरा त्याने कायम ठेवली आहे. यासह तो सर्वात कमी वयात ऑलिम्पिक पदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला. (फोटो-अमन सेहरावत सोशल मीडिया)
-
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट ही सुवर्णपदकासाठीचा सामना खेळणार होती पण, अतिरिक्त वजनामुळे तिला अपात्र ठरवत स्पर्धेबाहेर करण्यात आले. विनेशने रौप्य पदकासाठी क्रीडा कोर्टात याचिका दाखल केली असून १३ ऑगस्टपर्यंत याचा निर्णय येणे अपेक्षित आहे. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
Photos: मनू भाकेरपासून अमन सेहरावतपर्यंत… पाहा भारताचे सर्व पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेते
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण ६ पदकं जिंकली आहेत. भारताच्या कोणत्या खेळाडूंनी कोणत्या खेळात, किती पदकं मिळवली आहेत, याचा आढावा घेऊया.
Web Title: Indias paris olympic medalist list in marathi manu bhaker sarabjot singh swapnil kusale neeraj chopra aman sehrawat vinesh phogat indian hockey team bdg